मुंबई 12 ऑक्टोबर : अंधेरी पूर्व मतदारसंघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. ही निवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जात आहे. मात्र, ऋतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी दिलेला राजीनाम्याचा अर्ज अजूनही BMC प्रशासनानं स्वीकारला नाही. अशात आता याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ऋतुजा लटके आता BMC च्या कार्यालयात पोहोचल्या आहेत.
ऋतुजा लटके राजीनामा प्रकरणात अनिल परबांचा मोठा खुलासा, सांगितला ठाकरे गटाचा 'प्लॅन B'
ऋतुजा लटके आयुक्तांच्या भेटीसाठी कार्यालयात पोहोचल्या आहेत. महिनाभरापूर्वी त्यानी आपल्या राजीनाम्याचं पत्र दिलं होतं. याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी करण्यासाठी त्या आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत. आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या भेटीसाठी त्या वाट पाहत आहेत
पोटनिवडणुकीतील प्रस्तावित उमेदवार ऋतुजा लटके या महापालिकेत परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी 1 महिन्यापूर्वी राजीनामा दिला होता. मात्र, हा राजीनामा अद्याप BMC प्रशासनानं स्वीकारलेला नाही. जर राजीनामा स्वीकारला नाही तर त्या अंधेरी पोटनिवडणुकीत अर्ज भरू शकणार नाहीत.
Andheri By Election : ऋतुजा लटकेंच्या डोक्यात काय शिजतंय? BMC राजीनामा प्रकरणात धक्कादायक खुलासे
या प्रकरणाबाबत बोलताना अनिल परब म्हणाले, की ऋतुजा लटके माझ्या संपर्कात आहेत. योग्य वेळी आल्यावर त्या माध्यमांसमोर आपली भूमिका मांडतील.
ऋतुजा लटकेंना घाबरण्याचं कारण नाही. जाणुनबुजून त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढण्यासाठी किंवा आपल्या गटात खेचण्यासाठी हे केलं जातं आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र, लटके कुटुंब शिवसेनेशी एकनिष्ठ आहे, असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.