जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदे सरकार राहणार की जाणार? कर्नाटक निकालानंतर शिंदे गटाच्या खासदाराचं मोठं वक्तव्य

शिंदे सरकार राहणार की जाणार? कर्नाटक निकालानंतर शिंदे गटाच्या खासदाराचं मोठं वक्तव्य

शिंदे सरकारबाबत खासदारांचं मोठं विधान

शिंदे सरकारबाबत खासदारांचं मोठं विधान

कर्नाटकमध्ये काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र त्यानंतर महाराष्ट्रातील शिंदे, फडणवीस सरकारवर बोलताना शिंदे गटाच्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे.

  • -MIN READ Buldana,Buldana,Maharashtra
  • Last Updated :

बुलडाणा, 14 मे :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एक हाती सत्ता मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही फारसं काही वेगळ चित्र पहायला मिळणार नाही. कर्नाटकमधील विजय ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या विजयाची नांदी असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावरून आता शिंदे गटाने महाविकास  आघाडीवर विशेष: ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. नेमकं काय म्हणाले प्रतापराव जाधव? कर्नाटकातील काँग्रेसचा विजय ही जरी विजयाची नांदी असली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला या विजयातून काहीही मिळणार नाही. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही ठाकरे गटाचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच झाला आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यानंतर साखर पान वाटण्याचा प्रकार उद्धव ठाकरे करत असल्याचा हल्लाबोल खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

संजय राऊतांवर निशाणा  दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. त्यामुळे राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निर्णय घ्यायचा आहे. मात्र राहुल नार्वेकर हा निर्णय घेताना 16 ही आमदारांना अपात्र ठरवतील आणि येत्या तीन महिन्यात हे सरकार पडेल असं  भाकित संजय राऊत यांनी वर्तवलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला आहे. संजय राऊत हे काही भविष्यकार नाही. संजय राऊत यांनी गेल्या काही काळात अनेकदा हे सरकार दोन दिवसात पडेल चार दिवसात पडेल अशी भाकीत केली होती. तेव्हाही हे सरकार पडलं नाही. त्यामुळे तीन महिन्यानंतर हे सरकार पडणार नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात