मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'अमरावतीत पाय ठेवताना..'; रिव्हॉलवरचा गैरवापर पडला महागात, VIDEO VIRAL होताच पोलीस निलंबित

'अमरावतीत पाय ठेवताना..'; रिव्हॉलवरचा गैरवापर पडला महागात, VIDEO VIRAL होताच पोलीस निलंबित

व्हिडिओमध्ये (Viral Video) ते म्हणत होते, की 'अमरावती जिल्ह्यात पाय ठेवताना दादागिरी आणि भाईगिरी १० किमी लांबच ठेऊन यायचं. जो कायद्यात राहील तोच फायद्यात राहील

अमरावती 04 ऑगस्ट : हातात रिव्हॉलवर घेऊन व्हिडिओ बनवणं एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलंच भोवलं आहे. अमरावतीतील (Amravati) चांदूर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेश मुरलीधर काळे यांनी पोलिसांच्या गणवेशात हातात रिव्हॉलवर घेऊन व्हिडिओ (Viral Video of Police With Revolver) बनवला होता. यानंतर पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची (Police Suspended) कारवाई केली आहे.

VIDEO - जीवासह लाजही वाचवली! जवानाने आपल्या वर्दीने झाकलं तरुणीचं विवस्त्र शरीर

महेश काळे यांनी बनवलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या हातामध्ये रिव्हॉलवर होता तर ते पोलिसाच्या गणवेशात होते. व्हिडिओमध्ये ते म्हणत होते, की 'अमरावती जिल्ह्यात पाय ठेवताना दादागिरी आणि भाईगिरी १० किमी लांबच ठेऊन यायचं. जो कायद्यात राहील तोच फायद्यात राहील. कारण कसं आहे, का कायद्याचा बालेकिल्ला म्हणजेच अमरावती जिल्हा.' त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

सीटसाठी एकमेकांना फोडलं; मुंबई लोकलप्रमाणे अमेरिकन विमानात प्रवाशांची फायटिंग

महेश काळे यांनी तयार केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी महेश काळे हे आपल्या शासकीय गणवेशाचा आणि रिव्हॉलवरचा गैरवापर करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची दखल अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ एन हरिबालाजी यांनी दखल घेतली. यानंतर महेश काळे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

First published:

Tags: Police, Shocking video viral, Suspend