मराठी बातम्या /बातम्या /देश /VIDEO - सॅल्युट! जीवासह लाजही वाचवली! जवानाने आपल्या वर्दीने झाकलं आत्महत्या करायला गेलेल्या तरुणीचं विवस्त्र शरीर

VIDEO - सॅल्युट! जीवासह लाजही वाचवली! जवानाने आपल्या वर्दीने झाकलं आत्महत्या करायला गेलेल्या तरुणीचं विवस्त्र शरीर

तरुणीला ट्रेनखालून बाहेर काढलं तेव्हा तिच्या शरीरावरील कपडे फाटले होते.

तरुणीला ट्रेनखालून बाहेर काढलं तेव्हा तिच्या शरीरावरील कपडे फाटले होते.

तरुणीला ट्रेनखालून बाहेर काढलं तेव्हा तिच्या शरीरावरील कपडे फाटले होते.

नवी दिल्ली, 03 ऑगस्ट : आपल्या जीवाची बाजी लावून कित्येक लोकांना मृत्यूच्या दारातून परत आणणारे जवान (CISF Jawan saved life). किती तरी जणांचा जीव वाचवताना आपण त्यांना पाहिलं आहे. आपल्या जीव धोक्यात टाकून दुसऱ्यांना वाचवणाऱ्या धाडसी (CISF Jawan saved girl who trying to suicide) जवानांचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण आता अशा जवानाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्याने एका तरुणीचा जीवच नाही तर तिची लाजही वाचवली आहे (Delhi girl sucide).

दिल्लीत सीआयएसएफ (CISF) जवानांनी (CISF Jawan) तरुणीचा जीव वाचवताना जे काही केलं आहे, ते पाहून तुम्हीही सॅल्युट कराल. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला त्यांनी वाचवलंच पण त्यानंतर तिचं उघडं पडलेलं शरीर एका जवानाने आपल्या वर्दीने झाकलं आहे.

जवानांचा गणवेश, वर्दी म्हणजे त्यांची शान असते, त्यांचा अभिमान असतो. त्याच्यावर साधा डागही ते पडू देत नाही. पण जेव्हा एका तरुणीची लाज राखण्याची वेळ आली तेव्हा मात्र क्षणाचा विलंबही न करता हीच वर्दी आपल्या अंगावरून उतरवली आणि तरुणीच्या अंगावर चढवली.

हे वाचा - VIDEO : चाकू हल्ल्यात रक्तबंबाळ झाला तरुण; चिप्सच्या पॅकेटने पोलिसाने वाचवला जीव

दिल्लीच्या जनकपुरी मेट्रो स्टेशनमधील ही घटना. मेट्रोसमोर एका तरुणीने उडी मारली. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी तिला वाचवण्यासाठी सीआयएसएफचे जवान तात्काळ धावून आले. त्यांनी या तरुणीला वाचवलं. तरुणी ट्रेनच्या खाली गेली होती. ट्रेनखालून तिला या जवानांनी बाहेर काढलं. तिच्यात जीव होता. तरुणीला जिवंत पाहताच जवानांनी तिला उचललं आणि रुग्णालयात जाण्यासाठी त्यांनी धाव घेतली.

हे वाचा - रस्त्यावर धावत सुटला चिमुकला, वेगाने कार आली आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

या तरुणीच्या शरीरावरील कपडे फाटले होते. तिचं शरीर दिसत होतं. तिला दोन ट्रेनच्या मधून नेण्यात आलं. थोडं पुढे गेल्यावर या तरुणीला स्ट्रेचरवर ठेवलं. तेव्हा एका जवानाने आपल्या गणवेशाचा शर्ट उतरवतो आणि त्या तरुणीच्या अंगावर घालून तिचं उघडं शरीर झाकलं. त्यानंतरच या तरुणीला तिथून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं.

First published:

Tags: Delhi, Metro, Suicide, Viral, Viral videos