• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'नवरोबा, आपल्या बाळाला गमावलं, पुढच्या जन्मी नव्याने सुरुवात करू', दीपालींचं भावनिक पत्र

'नवरोबा, आपल्या बाळाला गमावलं, पुढच्या जन्मी नव्याने सुरुवात करू', दीपालींचं भावनिक पत्र

दीपाली चव्हाण यांनी आपल्या पतीला अतिशय भावनिक पत्र लिहलं आहे.

  • Share this:
अमरावती, 28 मार्च :  महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या दीपाली चव्हाण आत्महत्या (Deepali Chavan) प्रकरणामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी आपल्या पतीला (Deepali Chavan husband) भावनिक पत्र लिहिलं आहे. यात आपण आपल्या बाळाला गमावल्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच आपल्या आत्महत्येला अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांना जबाबदार धरलं आहे. मेळघाटच्या हरीसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी तीन सुसाईट नोट लिहल्याच समोर आलं आहे. पहिला पत्र वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांना तर दुसरा त्यांचा पती आणि तिसरा आपल्या आईच्या नावे आहे. हे तिन्ही पत्र धारणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायमची बंद होणार Air India? खाजगीकरणाबाबत मोदी सरकारने घेतला असा निर्णय दीपाली चव्हाण यांनी आपल्या पतीला अतिशय भावनिक पत्र लिहलं आहे. दीपाली चव्हाण यांनी आपल्या पती राजेश मोहिते यांना लिहलेल्या पत्रात DFO शिवकुमार यांचा वारंवार उल्लेख तर श्रीनिवासन रेड्डीचा देखील उल्लेख आहे. प्रिय, नवरोबा... लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलता बोलता मी तुम्हाला लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जादा कारण आता मी जीव देत आहे. साहेब, मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत तू नेहमी म्हणतोस माझी हार्ड डिस्क भरून गेली आहे. खरंच भरून गेलीये. साहेबाने मला पागल करून सोडलंय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात. ...तर शेतकरी आंदोलनावर तोडगा! केंद्र पुन्हा चर्चेसाठी तयार : नरेंद्र सिंह तोमर मी खूप सहन केलं पण आता माझी लिमिट खरच संपली आहे. यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण सुट्टी देखील तो मंजूर करत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होतं मी तुझी वाट पाहत होते घरी यायची. आज आई पण गावी गेली.. घरी कोणीच नाहीये घर खायला उठत आहे.. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा आहेस, माझ्यावर खूप प्रेम करतोस.. मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याचं त्रास देणे कमी झालं नाही. कॉलेजमधील रॅगिंगमुळं चित्रांगदा झाली अभिनेत्री; पाहा काय होता तो किस्सा मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं. मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे. आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आत्महत्येला सर्वश्री जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे, त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे. आपला संसार अपूर्ण राहिला पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस हीच कमी पडत आहे. माझी हार्ड डिक्स फुटत आहे त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे मला माफ कर माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार माझा डीसीएफ शिवकुमार हा आहे. - दीपाली
Published by:sachin Salve
First published: