नवी दिल्ली, 28 मार्च: सरकारी विमान कंपनी एअर इंडिया (Air India) बाबत सरकारचा (Modi Government) पवित्रा स्पष्ट झाला आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी शनिवारी अशी माहिती दिली कि, आता एअर इंडियामध्ये पूर्णपणे निर्गुंतवणूक केली जाईल किंवा कंपनी बंद होईल. हरदीपसिंग पुरी म्हणाले की, लवकरच एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी आर्थिक बोली मागविली जाईल. पुरी म्हणाले कि, आता सरकारकडे दोनच पर्याय आहेत - एकतर एअर इंडियाचे खाजगीकरण करणे किंवा कंपनी बंद करणे. बर्याच काळापासून या सरकारी विमान कंपनीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे.
कंपनीवर आहे 60,000 कोटींची कर्जाची थकबाकी
हरदीपसिंग पुरी म्हणाले कि, 'आम्ही ठरवले आहे की सरकार एअर इंडियामधील संपूर्ण 100 टक्के हिस्सेदारीची विक्री करेल. आमच्याकडे खाजगीकरण करण्याचा किंवा न करण्याचा पर्याय नाही आहे. असा पर्याय होता की या कंपनीला खाजगी करायचे की कामकाज बंद करायचे. एअर एंडिया फर्स्ट रेट अॅसेट आहे. पण यावर 60,000 कोटींचे कर्ज आहे. आम्हाला कर्जाचं ओझं संपवायचे आहे.'
पुरी यांनी असे म्हटले होते कि, 'सरकारकडून एअर इंडियामधील एकूण 100 टक्के भागीदारी विकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 2007 मध्ये एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सच्या विलिनीकरणानंतरही कंपनीचे नुकसान होत आहे. आमच्याकडे कोणताच पर्याय नाही आहे. आम्ही कंपनी बंद करू शकतो किंवा विकू शकतो. एअर इंडिया आता पैसे कमावत आहे तरी देखील कंपनीला दर दिवशी 20 कोटी रुपयांचा तोटा होत आहे. मिसमॅनेजमेंमुळे एअर इंडियावर 60,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे.'
(हे वाचा-31 मार्चपूर्वीच करा ही महत्त्वाची 10 कामं, 1 एप्रिलपासून लागू होणार नवे नियम)
त्यांनी पुढे असं म्हटले कि, एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी सरकार नवीन टाइमलाइन निश्चित करण्याच्या विचारात आहे. येत्या काही दिवसात एअर इंडियासाठी बोली मागविण्यात येणार आहेत.
पुरी म्हणाले, 'सोमवारी झालेल्या बैठकीत शॉर्टलिस्टेड कंपन्यांना असे सांगण्यात आले आहे की त्यांना 64 दिवसांत बिडिंग करावी लागेल. यावेळी सरकार पूर्णपणे तयार आहे. यात कोणताही संकोच नाही.' केंद्रीय मंत्री म्हणाले की एअर इंडियाची विक्री मे किंवा जूनपर्यंत होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Air india, Economy, India, Money, Travel by flight