मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कॉलेजमधील रॅगिंगमुळं चित्रांगदा झाली अभिनेत्री; पाहा काय होता तो किस्सा

कॉलेजमधील रॅगिंगमुळं चित्रांगदा झाली अभिनेत्री; पाहा काय होता तो किस्सा

चिंत्रांगदाला लहानपणापासून अभिनयाची आवड नव्हती. (ragging in colleges) कॉलेमध्ये झालेल्या एका रॅगिंगमुळं तिनं अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला. पाहा काय होता तो गंमतीशीर किस्सा...

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 28 मार्च: चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh) ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल चिंत्रांगदाला लहानपणापासून अभिनयाची आवड नव्हती. (ragging in colleges) कॉलेमध्ये झालेल्या एका रॅगिंगमुळं तिनं अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला. पाहा काय होता तो गंमतीशीर किस्सा...

चित्रांगदा लवकरच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव बॉब बिस्वास असं आहे. (Bob Biswas) या चित्रपटाच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत तिनं हा किस्सा सांगितला. ती म्हणाली, “कॉलेजमध्ये फर्स्ट ईयरला असताना माझी रॅगिंग झाली होती. मला उलटा सलवार घालून, केसांना भरपूर तेल लावायला सांगितलं. त्यानंतर माझी सर्व पुस्तक त्यांनी एका बादलीत ठेवली. ती बादली माझ्या डोक्यावर ठेवून मला रॅम्पवॉक करायला सांगितलं. खरं तर मी त्यावेळी खूपच घाबरले होते. त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं प्रामाणिकपणे मी रॅम्पवॉक केला. माझा तो वॉक पाहून सर्व जण माझी स्तुती करु लागले. तू तर अगदी एखाद्या प्रोफेशनल मॉडेल प्रमाणे चालतेस अशा कॉमेंट मला मिळू लागल्या. त्यावेळी मी मॉडलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. पुढे मॉडलिंग करताना मला चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. अन् अशा पद्धतीनं माझी बॉलिवूडमध्ये एण्ट्री झाली.”

अवश्य पाहा - सेलिब्रिटींची धम्माल होळी; 21 वर्षांपूर्वीचा Video होतोय व्हायरल

चित्रांगदा लवकरच ‘बॉस बिस्वास’ या चित्रपटात एक महत्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ‘बॉब बिस्वास’ या व्यक्तिरेखेवर आधारित आहे. 2012 साली प्रदर्शित झालेल्या ‘कहानी’ या चित्रपटात ‘बॉब बिश्वास’ हे काल्पनिक पात्र तयार करण्यात आलं होतं. याच पात्रावर आधारित ‘बॉब बिस्वास’ हा चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. ‘कहानी’ या चित्रपटात बॉब बिस्वास नावाचा एक कॉन्ट्रॅक्ट किलर होता. ही भूमिका श्वाश्वत चटर्जीने साकारली होती.

First published:

Tags: Actress, Bollywood, Bollywood News, Chitrangada singh, Entertainment