दिपक बोरसे, धुळे 16 ऑक्टोबर : राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी नुकतंच धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी भाजप आणि शिंदे गटावरही निशाणा साधला. या सरकारमधील मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी कोणतंही देणंघेणं नसल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला. शिंदे सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज आला असून त्यांना शेतकऱ्यांनी काहीही देणं-घेणं नाही, असं ते म्हणाले. Andheri East Bypoll : 10 वॉर्ड अन् 10 आमदार, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन दरम्यान, निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि नाव गोठवलं आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांना नवं नाव आणि चिन्ह देण्यात आलं आहे. यातील ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावरुनही अंबादास दानवे यांनी भाजपला सुनावलं. मशाल ही मजबूत हातात असून तुम्ही तुमचं कमळ सांभाळा, असा सल्ला त्यांनी चंद्रशेखन बावनकुळे यांना दिला. अंबादास दानवे म्हणाले, की मशाल ही मजबूत हातात आहे. तुम्ही तुमचं कमळ सांभाळा. हीच शिवसेना आणि मशाल तुम्हाला महाराष्ट्रात नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नसल्याचा गंभीर इशाराही विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला आहे. विरोधी पक्षनेते दानवे यांनी धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये; बुलढाण्यात शिंदे गटाच्या माजी आमदाराला शह देण्यासाठी हालचालींना वेग या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री हे फक्त निवडणुकांपुरते जिल्ह्यात येतात आणि निघून जातात, असा आरोप करत अंबादास दानवे यांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन त्यांनी शिंदेंच्या मंत्र्यांनाही टोला लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







