मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Andheri East Bypoll : 10 वॉर्ड अन् 10 आमदार, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन

Andheri East Bypoll : 10 वॉर्ड अन् 10 आमदार, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन

भाजपचा प्लॅन

भाजपचा प्लॅन

नुकतंच अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात भाजपाच्यावतीने अंधेरी मतदारसंघातील प्रत्येक वार्डाची जबाबदारी आमदारांना दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 16 ऑक्टोबर : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. ठाकरे गट आणि भाजप यांच्यामध्ये ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष तयारीला लागले आहेत. या मतदारसंघाच्या एका जागेसाठी 14 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. मात्र, यात भाजप विरुद्ध ठाकरे गट म्हणजेच ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पटेल कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याने लटके-पटेल यांच्यात थेट लढत होणार आहे. या मतदारसंघात दोन्ही पक्ष आपली ताकद पणाला लावत आहेत.

उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; बुलढाण्यात शिंदे गटाच्या माजी आमदाराला शह देण्यासाठी हालचालींना वेग

नुकतंच अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात भाजपाच्यावतीने अंधेरी मतदारसंघातील प्रत्येक वार्डाची जबाबदारी आमदारांना दिली आहे. अंधेरीतील 10 वॉर्डसाठी भाजपचे दहा आमदार मैदानात उतरणार आहेत. तर, पोलिंग बुथची जबाबदारी भाजपच्या माजी नगरसेवकांकडे देण्यात आली आहे.

मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपचे प्रमुख आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात हा निर्णय झाला. बैठकीसाठी मुंबई प्रभारी आमदार अतुल भातकळकर, विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, प्रतोद प्रसाद लाड, आमदार योगेश सागर, मनिषा चौधरी, पराग अळवणी, अमित साटम, कॅप्टन तमिल सेलवन, यांच्यासह जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.

Andheri East Bypoll : अंधेरीमध्ये लटकेंसोबत डमी उमेदवार, ठाकरेंना नेमकी कशाची भीती?

दुसरीकडे ठाकरे गटही आपली ताकद वाढवताना दिसत आहे. अंधेरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. अंधेरीत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मविआच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी मार्गदर्शन केलं. ऋतुजा लटके यांच्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

First published:

Tags: Andheri, BJP