बुलढाणा, 15 ऑक्टोबर : राज्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख आज शिवबंधन बांधत असताना दुसरीकडे बुलढाणा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार व आता शिंदे गटात सामील झालेले संजय गायकवाड यांना शह देण्यासाठी उद्धव गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे तीन वेळेस आमदार असलेले व सध्या भाजपात असलेले माजी आमदार विजयराज शिंदे हे पुन्हा शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे बुलढाण्याचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांना या मतदार संघात तीन वेळा आमदार राहिलेल्या विजयराज शिंदे यांच्याकडून आव्हान देण्याची रणनीती उद्धव गटाकडून आखल्या जात असल्याची चर्चा सध्या जिल्हाभरात होत आहे. अंधेरीमध्ये लटकेंसोबत डमी उमेदवार, ठाकरेंना नेमकी कशाची भीती? मात्र विजयराज शिंदे कधी शिवबंधन बांधतील याबाबत शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की ही लोकशाही आहे आणि मी 15 वर्षात शिवसेनेचा आमदार म्हणून केलेल्या कामाची कुणी दखल घेत असेल तर वावग काय…? मात्र अद्यार उद्धव गटाच्या कुठल्याच मोठ्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क केलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र बुलढाण्यात आता बंडखोर आमदार संजय गायकवाड यांना शह देण्यासाठी हालचालींना वेग आल्याच चित्र राजकीय वर्तुळात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.