Home /News /maharashtra /

अबतक 36! एकनाथ शिंदेंच्या गटाची ताकद आकडाच ठरवणार; मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतरही गळती थांबेना

अबतक 36! एकनाथ शिंदेंच्या गटाची ताकद आकडाच ठरवणार; मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतरही गळती थांबेना

शिवसेनेचे आणखी काही आमदार गुवाहटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत.

    मुंबई, 23 जून : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातल्यानंतरही शिवसेनेचे आणखी काही आमदार गुवाहटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून ते आज गुवाहाटीला पोहोचतील अशी माहिती आहे. आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar), सदा सरवणकर (Sada Sarvankar), दादा भुसे (Dada Bhuse), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), संजय राठोड (Sanjay Rathod) आणि दिलीप लांडे (Dilip Lande) यांच्याशी संपर्क झालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) काल वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर दाखल झालेत. काही ठिकाणी शिवसैनिक (Shivsena) रस्त्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत, तर दुसरीकडे गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनामध्ये असलेल्या आमदारांची संख्या वाढत आहे. दरम्यान, काल एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना 34 आमदारांची सही असलेलं एक पत्र लिहिलं, या पत्रात राजकुमार पटेल, बच्चू कडू, राजेंद्र पाटील, नरेंद्र भोंडेकर या अपक्ष आमदारांची सही आहे, तर या पत्रावर सही असलेले नितीन देशमुख गुजरातहून महाराष्ट्रामध्ये आले आहेत. हे वाचा -  VIDEO : शिवसेनेचा ढाण्या वाघ गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना जावून मिळाला शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या या आमदारांची संख्या 36 झाली तरी एकनाथ शिंदे यांना दोन-तृतियांश शिवसेना फोडण्यासाठी आणखी एका आमदाराची गरज लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 आमदार असतील तर त्यांना वेगळा गट स्थापन करता येईल तसंच कोणत्याही आमदाराला पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही. शिवसेनेचे आमदार - शंभुराज देसाई- पाटण संजय शिरसाट- औरंगाबाद नितीन देशमुख- बालापूर (महाराष्ट्रात परत) किशोर पाटील- पाचोरा प्रकाश सुर्वे- मागठाणे लता सोनावणे- चोपडा यामिनी जाधव- भायखळा सुहास कांदे- नांदगाव विश्वनाथ भोईर- कल्याण पश्चिम अनिल बाबर- खानापूर चिमणराव पाटील- एरंडोल शहाजी पाटील- सांगोला शांताराम मोरे- भिवंडी ग्रामीण श्रीनिवास वनगा- पालघर बालाजी किणीकर- अंबरनाथ रमेश बोरणारे- वैजापूर प्रदीप जयस्वाल- औरंगाबाद संजय रायमुलकर- मेहकर महेंद्र दळवी- अलिबाग महेंद्र थोरवे- कर्जत भरत गोगावले- महाड संदीपान भुमरे- पैठण तानाजी सावंत- परांडा बालाजी कल्याणकर- नांदेड अब्दुल सत्तार- सिल्लोड प्रताप सरनाईक- ओवळा माजीवाडा ज्ञानराज चौघुले- उमरगा संजय गायकवाड- बुलडाणा कोरेगाव- महेश शिंदे एकनाथ शिंदे- कोपरी-पाचपाखाडी गुलाबराव पाटील योगेश कदम दीपक केसरकर प्रहार राजकुमार पटेल बच्चू कडू अपक्ष राजेंद्र पाटील- शिरोळ नरेंद्र भोंडेकर- भंडारा मंजुळा गावित चंद्रकांत पाटील हे वाचा - वर्षाचा कर्मचारी हात जोडून मुख्यमंत्र्यांसमोर उभाच राहीला, भावुक करणारा तो Video रात्री उशिरा गुलाबराव पाटील आणि योगेश कदम आल्यामुळे शिवसेना आमदारांची संख्या 31 झाली होती. मुंबईमध्ये असलेले दीपक केसरकर यांनीही शिवसेनेने भाजपसोबत जावं, ही भूमिका मांडली आहे. या गणितानुसार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 36 तर अपक्ष आणि इतर पक्षांचे 6 असे एकूण 41 आमदार झाले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivseana, Udhav thackarey

    पुढील बातम्या