जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / वर्षाचा कर्मचारी हात जोडून मुख्यमंत्र्यांसमोर उभाच राहीला, भावुक करणारा तो Video 

वर्षाचा कर्मचारी हात जोडून मुख्यमंत्र्यांसमोर उभाच राहीला, भावुक करणारा तो Video 

वर्षाचा कर्मचारी हात जोडून मुख्यमंत्र्यांसमोर उभाच राहीला, भावुक करणारा तो Video 

मुख्यमंत्र्यांच्या भाषनानंतर मुंबईभरातून शिवसैनिक वर्षा बंगल्याच्या दिशेने निघाले होते. एवरी राडा घालणाऱ्या शिवसैनिकांच्या डोळ्यात आज अश्रू दिसत होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जड अंत:करणाने कुटुंबासह वर्षा बंगला सोडला. जाताने त्यांनी वर्षा बंगल्यावरील आपल्या स्टाफचीही भेट घेतली. यावेळी कर्मचारी हात जोडून मुख्यमंत्र्यांसमोर उभे राहत होते. अनेकांनी त्यांना नमस्कारही केला. यावेळी त्यांच्याभोवती शिवसैनिकांचा मोठा गराडा होता. उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांना निरोप दिला. ही बाब सर्वांसाठीह हृदय पिळवटून टाकणारी होती. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. (CM Uddhav Thackeray along with his family leaves from his official residence) वर्षा ते मातोश्री या 9 किलोमीटर अंतरादरम्यान ठिकठिकाणी शिवसैनिक आपल्या नेत्याचं स्वागत करण्यासाठी उभे होते.

मुख्यमंत्र्यांच्या भाषनानंतर मुंबईभरातून शिवसैनिक वर्षा बंगल्याच्या दिशेने निघाले होते. एवरी राडा घालणाऱ्या शिवसैनिकांच्या डोळ्यात आज अश्रू दिसत होते. आपल्या नेत्याला झालेल्या दु:खामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक दुखावल्याचं सांगितलं जात होतं. शेवटी आज 9 वाजून 45 मिनिटांनी उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना सोबत घेऊन मातोश्रीच्या दिशेने निघाले. वर्षाच्या दाराच्या बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्र्यांनी उंबरठा ओलांडताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांच्या गाडीला मुख्यमंत्र्यांनी गराडा घातला. आपल्या नेत्यासाठी हे शिवसैनिक मुंबईतील कानाकोपऱ्यातून येत होते. यावेळी रश्मी ठाकरे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात