नांदेड 31 जुलै : अजित पवार सध्या राज्यातील विविध भागांमध्ये भेट देऊन पूरस्थिती तसंच पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. दरम्यान नांदेडमध्ये बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झालं . शिंदे आणि फडणवीस यांनी शपथ घेतली . मात्र, एकदा फडणवीस यांनी शिंदे यांचा माईक खेचला आणि एकदा त्यांना बोलत असताना चिठ्ठी दिली होती. त्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीस यांना चिमटा काढला. आदित्य ठाकरे घेणार शंभूराज देसाईंच्या बालेकिल्ल्यात सभा! ‘या’ व्यक्तीला मिळणार ताकद? अजित पवार म्हणाले, ‘मी पण दोन वेळा उपमुख्यमंत्री होतो. पण मुख्यमंत्री बोलताना मी कधी माईक खेचला नाही किंवा चिठ्ठी पास केली नाही. मुख्यमंत्री हे पद एक नंबरचं असतं. त्यामुळे त्याचा आदर करणं गरजेचं असतं. तुम्हाला बोलायचं असेल तर नंतर बोला, असं अजित पवार म्हणाले. राजकारणात संयम ठेवला पाहिजे असा सल्ला अजित पवार यांनी फडणवीस यांना दिला. दरम्यान, पूर आणि अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी करत आहेत. अजित पवार म्हणाले, की आमचीही हीच मागणी आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सोयाबीन, कापूस, तुर या पिकांना हेक्टरी 75 हजार आणि फळबागांना जास्तीचे अनुदान द्यावे. तसंच बाधित शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली . दिवस ठरला, वेळही ठरली; अखेर शिवसेनेच्या ठाकरेंचा ‘अर्जुन’ शिंदे गटात करणार प्रवेश नवीन सरकारने अनेक निर्णय रोखले आहेत. पण सरकारने लोकहिताचे , विकासाचे निर्णय थांबवू नये, अशी अपेक्षा असल्याचं अजित पवार म्हणाले . राज्यपालांनी मुंबईबद्दल केलेल्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, की राज्यपाल यांनी महाराष्ट्राबद्दल जे वक्तव्य केलं, त्यावरून राज्यभरात वादंग उठलं. एकतर अशा मोठया पदावरील व्यक्तीने असं वक्तव्य करू नये. जर चूक झालीच तर दिलगिरी व्यक्त करावी, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली ..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.