मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दिवस ठरला, वेळही ठरली; अखेर शिवसेनेच्या ठाकरेंचा 'अर्जुन' शिंदे गटात करणार प्रवेश

दिवस ठरला, वेळही ठरली; अखेर शिवसेनेच्या ठाकरेंचा 'अर्जुन' शिंदे गटात करणार प्रवेश

त्यावेळी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांना अश्रू अनावर झाले.

त्यावेळी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांना अश्रू अनावर झाले.

त्यावेळी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांना अश्रू अनावर झाले.

    मुंबई, 30 जुलै : शिवसेनेतील उद्धव ठाकरेंचा अर्जुन अखेर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळीच त्यांनी याबाबत माहिती दिली होती. यावेळी ते म्हणाले,  'काही परिस्थितीमुळे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहे. शिंदे गटात जाण्याआधी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कानावर टाकले आहे. त्यामुळे त्यांचं समाधान झालं आहे, आज मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे' असं म्हणत शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांना अश्रू अनावर झाले. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर उद्या सिल्लोड येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेले काही दिवस अर्जुन खोतकर सातत्याने दिल्ली वाऱ्या करत होते. दिल्लीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ही घेतली होती. काय म्हणाले खोतकर.. 'माझ्यावर जी काही परिस्थिती आली आहे, ती मला माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुखांशी बोललो, संजय राऊतांशी बोललो. सगळ्यांशी बोललो. मी सच्चा शिवसैनिक आहे. पण घरी आल्यावर परिवार दिसतो. त्यामुळे काही निर्णय करणे गरजेचे आहे. मी पक्षप्रमुखांकडे मागणी केली आणि त्यांनी मला काय बोलायचे ते सांगितले. त्यामुळे मी आज शिवसैनिकांच्या साक्षीने एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. मी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहे. काही परिस्थितीमुळे निर्णय घ्यावा लागत आहे. हे पक्षाच्या कानावर टाकले आहे. त्यामुळे त्यांचं समाधान झालं आहे, आज मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे' असं म्हणत अर्जुन खोतकर यांना अश्रू अनावर झाले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Shivsena, Uddhav thackarey

    पुढील बातम्या