मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'त्याबद्दल मला प्रशिक्षण द्या, जरा ज्ञानात भर पाडून घेतो'; अजित पवारांचा फडणवीसांना मिश्किल टोला

'त्याबद्दल मला प्रशिक्षण द्या, जरा ज्ञानात भर पाडून घेतो'; अजित पवारांचा फडणवीसांना मिश्किल टोला

तुमच्याकडून प्रशिक्षण कधी मिळेल आणि ते मोफत आहे का काही फी लागणार आहे? असं त्यांना विचारतो आणि ज्ञानात भर पाडून घेतो, असा मिश्किल टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

पुणे 30 सप्टेंबर : अजित पवार यांनी नुकतंच राज्यातील अनेक राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. सध्याच्या सरकारमधील पालकमंत्र्यांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांना आता पत्र लिहितो. तुमच्याकडून प्रशिक्षण कधी मिळेल आणि ते मोफत आहे का काही फी लागणार आहे? असं त्यांना विचारतो आणि ज्ञानात भर पाडून घेतो, असा मिश्किल टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला आहे.

राजकीय वादात मुंबईकरांचे हाल? दसरा मेळाव्यादिवशी वाहतूक कोंडीची शक्यता, दोन्ही गटांकडून हजारो बस आरक्षित

एक जिल्हा सांभाळणं सोपं नाही, फडणवीस सहा जिल्हे सांभाळणार आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देत फडणवीसांनी अजित पवारांना प्रशिक्षण देऊ, असं म्हणत टोला लगावला होता. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान छगन भुजबळ यांनी देवी सरस्वतीच्या फोटोबद्दल केलेल्या विधानामुळे भाजपने आंदोलन केलं. यामुळे हे प्रकरण चर्चेत आहे. मात्र यातून आता राष्ट्रवादीनं मात्र हात झटकल्याचं पाहायला मिळालं.

देवी सरस्वतीच्या फोटोवरुन भुजबळांनी जे वक्तव्य केलं ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. बच्चू कडू यांनी एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावलेला एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. यावरही पवारांनी प्रतिक्रिया दिली. ही मारहाण योग्य वाटत नाही, असं ते म्हणाले. मतदारांना चांगली लोकं निवडून यावी, असं वाटतं. लोकांना मुस्काटात मारणारी आणि बंदूक काढणारी लोकं नको असतात, असं ते म्हणाले.

Rashmi Thackeray Thane : रश्मी ठाकरे ठाण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया म्हणाले

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, की मोठे राजकीय मेळावे घडतात तेव्हा पोलीस यंत्रणा लागते. दोन्ही गटाचं भाषण एकाचवेळी सुरू झालं तर आधी उद्धव ठाकरेंचं भाषण बघणार आणि नंतर एकनाथ शिंदेंचं असं अजित पवार म्हणाले.

First published:

Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis