जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मुलासाठी बाळासाहेबांनी पुतण्याला बाजूला केलं, आता ते असते तर...'; शिंदे गटातील आमदारांना टोला

'मुलासाठी बाळासाहेबांनी पुतण्याला बाजूला केलं, आता ते असते तर...'; शिंदे गटातील आमदारांना टोला

'मुलासाठी बाळासाहेबांनी पुतण्याला बाजूला केलं, आता ते असते तर...'; शिंदे गटातील आमदारांना टोला

अजित पवार (Ajit Pawar) यांनी जळगाव येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती आणि नशा चढली आहे, असं ते म्हणाले.

  • -MIN READ Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

जळगाव 16 सप्टेंबर : जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यादरम्यान अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. शिंदे गटाचा आमदार गोळीबार काय करतो, आमदाराचा मुलगा शिवीगाळ काय करतो, बोरिवलीचा आमदार विरोधकांचे हातपाय तोड्याच्या चिथवण्या काय देतो, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं अजित पवार म्हणाले. शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती आणि नशा आहे. आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती, अशी टीका अजित पवारांनी केली आहे. गणपतीनंतर दिवाळीही जोरात! मुख्यमंत्र्यांची मुंबईबाबत मोठी घोषणा शिवाजी पार्कच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की माझे आता वय झाले आहे. शिवसेनेचे या पुढील नेतृत्व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहा. बाळासाहेबांनी याबाबत त्यांच्या पुतण्याला ही बाजूला केले होते. हे आमदार मात्र तिकडे पळाले. बाळासाहेब हयात असते तर एकनाथ शिंदे यांची बिन पाण्याने केली असती, अशी टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे अजित पवार यांनी जळगाव येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती आणि नशा चढली आहे. चून चून के मारायला काय घरातल्या मुंग्या आहेत का? असा सवाल करत अजित पवारांनी संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी अजित पवार यांनी आमदार संजय गायकवाड यांची मिमिक्री करत कार्यकर्त्यांमध्ये एकच हसा पिकवला. यासोबतच काय झाडी, काय डोंगर, कायत हॉटेल यातून महाराष्ट्राची बदनामी ही महाराष्ट्रातच नाही तर राज्यच्या बाहेरही होत आहे, असं म्हणत त्यांनी शहाजीबापू पाटील यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, की ‘कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. एकही आमदार कमी झाला तरी सरकार पडेल. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. म्हणूनच पालकमंत्री नियुक्त होत नाहीत.’ अजित पवारांसमोरच खडसेंची राष्ट्रवादीवर नाराजी, भाषणावेळी अचानक बत्तीगूल! VIDEO दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदारसंघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात पाचोरा शहरासह तालुक्यातील विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात