RBI ने कर्जवसुली स्थगितीबाबत दिलेल्या 'सल्ल्या'वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

RBI ने कर्जवसुली स्थगितीबाबत दिलेल्या 'सल्ल्या'वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

कोरोना विषाणूचा (Coronavirus) सामना करण्यासाठी भारतात प्रत्येक संस्था प्रयत्नशील आहे. संपूर्ण देशात लॉकडॉऊन आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च: कोरोना विषाणूचा (Coronavirus) सामना करण्यासाठी भारतात प्रत्येक संस्था प्रयत्नशील आहे. संपूर्ण देशात लॉकडॉऊन आहे. याच काळात देशाची आर्थिक बाजू सांभाळण्याची सर्वात जास्त गरज आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्जाच्या EMI बाबत काही घोषणा केल्या आहेत तर बँकांना सल्लाही दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे आरबीआयने सर्व टर्म लोनवरील 3 महिन्यांचा मोरोटोरियम लागू केला आहे. यामुळे बँका त्यांच्या ग्राहकांना 3 महिन्यांचा ईएमआय न भरण्याची मुभा देऊ शकतात आणि यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोअर देखील खराब होणार नाही.

हेही वाचा.. कौतुकास्पद! कोरोनाविरोधातील लढाईसाठी आता महाराष्ट्रातील गुरुजींनी घेतला पुढाकार

आरबीआयच्या घोषणेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. देशातील बँका व वित्तीय संस्थांनी कर्जवसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करावी, असा केवळ सल्ला देऊन या बँका ऐकणार नाहीत. त्यांना रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट निर्देश जाणे अपेक्षित आहे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

हेही वाचा...फिरायला गेले आणि अडकून बसले; पैसेही संपत आले, महिला पर्यटकांना कोसळलं रडू

अजित पवार म्हणाले, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले देशव्यापी 'लॉकडाऊन' आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता रिझर्व्ह बँकेकडून हे निर्णय अपेक्षित होते.राष्ट्रीय, खासगी, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांनी त्यांची कर्जवसुली तीन महिने थांबवण्यासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या संस्थांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी वित्तमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

First published: March 27, 2020, 3:49 PM IST

ताज्या बातम्या