कौतुकास्पद! कोरोनाविरोधातील लढाईसाठी आता महाराष्ट्रातील गुरुजींनी घेतला पुढाकार

कौतुकास्पद! कोरोनाविरोधातील लढाईसाठी आता महाराष्ट्रातील गुरुजींनी घेतला पुढाकार

राज्यातील प्राध्यापकांची संघटना असलेल्या अखिल भारतीय शैक्षणिक महासंघाने मोठा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : कोरोनाचा व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. तसंच या रोगाशी लढण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज भासणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्राध्यापकांची संघटना असलेल्या अखिल भारतीय शैक्षणिक महासंघाने मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीला जवळपास 8000 प्राध्यापक आपला एक दिवसाचा पगार देणार आहेत. या संघटनेत 8 विद्यापीठाच्या प्रधायपकांचे सदस्य आहेत. कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षक संघटना , जळगाव, संत गाडगेबाबा अमरावती शिक्षण मंच, गोंडवाना शिक्षण मंच, गोंडवाना विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ शिक्षण मंच, नांदेड यासह एकूण 8 विद्यापीठांचे प्राध्यापक यामध्ये सहभागी आहेत.

अनेक राजकीय पक्षांनीही घेतला आहे निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन कोरोना बधितासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी याबाबत एक पत्रक जारी केलं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करत आहे. जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी देशात संचारबंदी सारखं पाऊल उचलावे लागले आहे. त्यामुळे लोकांचा रोजगार बुडाला आहे. शेती व उद्योगधंद्यांवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे. या अभूतपूर्व संकटावेळी राष्ट्रवादी पक्ष जनतेसोबत आहे, असं शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

दुसरीकडे, कोरोनाविरोधात या लढ्यात शिवसैनिक खारीचा वाट उचलणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून याबद्दल घोषणा केली आहे. 'सेनेचे सर्व खासदार,आणि आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहेत' अशी माहिती राऊत यांनी दिली.

दरम्यान, भाजपचे मुंबईतील आमदार, नगरसेवक यांनी 1 महिन्याचे वेतन कोरोना व्हायरस प्रतिबंध उपाययोजना यासाठी दिले, अशी माहिती मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

First published: March 27, 2020, 1:50 PM IST

ताज्या बातम्या