मुंबई 15 ऑगस्ट : आज देशात अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. यानिमित्नाने विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसंच त्यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घराणेशाहीविरोधातील विधानावरही प्रतिक्रिया दिली आहे. आपण जातीय सलोखा जपून पुढे जायला पाहिजे. देशासमोर मोठं आव्हान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधात लढण्यासाठी एकत्र या, लाल किल्ल्यावरून मोदींनी साधला काँग्रेसवर निशाणा दरम्यान, पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांसोबत संवाद साधताना घराणेशाहीवर सडकून टीका केली. यावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, की ज्यांच्यामध्ये कुवत आहे अशा लोकांना सत्तेवर बसवत असाल तर याला घराणेशाही बोलणं चुकीचं आहे. कुवत नसलेली लोक सत्तेत बसत असतील, तर आपण त्याला घराणेशाही बोलू शकतो. काय म्हणाले होते पंतप्रधान? भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे देशाला लागलेली कीड आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून निशाणा साधला होता. आज आपल्याला दोन मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाही, भाऊ- भाच्याचे राजकारण सुरू आहे. देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी निर्धार केला आहे. युवकांनो तिरंग्याची शपथ घेऊन पुढे जा! पंतप्रधानांनी सांगितलं पुढील 25 वर्षांचं महत्त्व पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, की उद्धव ठाकरे यांच्या काळात जय महाराष्ट्र आधी बोलायचे. मात्र, आता ती प्रथा बदलली आहे. सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांनी सरकारी कार्यालयात वंदे मातरम् बोलण्याचा आदेश दिला आहे. हा त्यांचा अधिकार आहे, असंही अजित पवार म्हणाले. राज्यात शासकीय कार्यालयात आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ने संभाषणाला सुरुवात करण्याबाबतची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यावर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.