नवी दिल्ली 15 ऑगस्ट : आज देशात अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवव्यांदा ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर नरेंद्र मोदींनी संबोधनाला सुरुवात केली. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर लोक लढतील. भारत अंधकारयुगात जाईल, अशा अनेक कुशंका व्यक्त केल्या गेल्या. मात्र या देशाच्या मातीत सामर्थ्य आहे, असं पंतप्रधान म्हणाले. Live Update: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव! मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण आपण अन्नाचं संकट झेललं. कधी युद्धाची शिकार झालो. दहशतवादाचं संकट आलं. अनेक लोकांचा मृत्यू झाला. नैसर्गिक संकटं आली. मात्र भारत देश पुढे चालला आहे. भारताची विविधता हीच भारताची अनमोल शक्ती आहे. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. विश्व भारताकडे गर्वाने, अपेक्षाने पाहतोय. प्रत्येक समस्येचं समाधान शोधण्यासाठी जग आपल्याकडे पाहतोय, असंही पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. 75 वर्षांचा कालखंड कितीही कठीण किंवा चांगला असला तरी पुढील 25 वर्षे देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे १३० कोटी देशवासीयांच्या स्वप्नांकडे मी पाहत आहे. येणाऱ्या 25 वर्षांसाठी पंचप्राणावर आपली शक्ती केंद्रित करावी लागेल. जेव्हा स्वातंत्र्याचे 100 वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत आपल्याला सर्व स्वप्नं पूर्ण करण्यासाठी काम करावं लागेल, असं आवाहनही मोदींनी केलं. यापुढील काळात भारताला विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करायची असेल, तर पंचप्राण ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. Independence Day: आजपासून देश संरक्षणाचा उचला विडा; सैन्यात सध्या कुठे आहेत ओपनिंग्स? माहिती एका क्लिकवर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला येऊन लाल किल्ल्यावरून भाषण करणारा मी पहिला पंतप्रधान आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांच्या प्रवासात देशाने अनेक चढउतार पाहिले. २०१४ मध्ये देशवासियांनी मला जबाबदारी दिली. देशातील शेवटच्या व्यक्तीसाठी काम करण्याचा महात्मा गांधींचा मंत्र मी जपला, असंही मोदी यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.