मराठी बातम्या /बातम्या /देश /

भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधात लढण्यासाठी एकत्र या, लाल किल्ल्यावरून मोदींनी साधला काँग्रेसवर निशाणा

भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधात लढण्यासाठी एकत्र या, लाल किल्ल्यावरून मोदींनी साधला काँग्रेसवर निशाणा

lokmat news 18, lokmat news, marathi news, पंतप्रधान नरेंद्र मोदी, pm narendra modi speech,

lokmat news 18, lokmat news, marathi news, पंतप्रधान नरेंद्र मोदी, pm narendra modi speech,

आपल्या अनेक संस्था या घराणेशाहीमुळे प्रभावित आहे. हे आपल्या देशाची प्रतिभा, राष्ट्राची क्षमतेला नुकसान पोहोचवत आहे

  • Published by:  sachin Salve
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : 'भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आता आपल्याला एक समाज म्हणून एकत्र येणे गरजेचं आहे.  भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या दंड ठोठावण्यासाठी आपल्याला एकत्र येणे गरजेचं आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे देशाला लागलेली कीड आहे. जिथे देशभरात गरीब लोक जगण्यासाठी लढत आहे, तिथे आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात पूर्ण ताकदीने लढावे लागणार आहे' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडला. यावेळी देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी निर्धार केला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आता आपल्याला एक समाज म्हणून एकत्र येणे गरजेचं आहे.  भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या दंड ठोठावण्यासाठी आपल्याला एकत्र येणे गरजेचं आहे. जोपर्यंत या भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा देण्याची आपली मानसिकता होणार नाही, तोपर्यंत राष्ट्राची प्रगती होणार नाही. आपल्या अनेक संस्था या घराणेशाहीमुळे प्रभावित आहे. हे आपल्या देशाची प्रतिभा, राष्ट्राची क्षमतेला नुकसान पोहोचवत आहे आणि भ्रष्टाचाराला जन्म देत आहे, अशी टीका  मोदींनी केली. आज आपल्याला दोन मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाही, भाऊ- भाच्याचे राजकारण सुरू आहे. भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे. आपल्याला त्याविरोधात लढावे लागणार आहे. आपल्याला आपल्या संस्था आणखी ताकदवर कराव्या लागणार आहे, आपली योग्यता ओळखून पुढे जाण्यासाठी घराणेशाहीविरोधात जागरूकता दाखवावी लागणार आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी गांधी घराण्यावर निशाणा साधला. भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे देशाला लागलेली कीड आहे. जिथे देशभरात गरीब लोक जगण्यासाठी लढत आहे, तिथे आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात पूर्ण ताकदीने लढावे लागणार आहे. आपल्यासमोर अनेक संकट आहे. अनेक अडथळे आहे, पण आपल्याला नव्या भारताकडे जाण्यासाठी पूर्ण क्षमता आहे. आपल्याला भ्रष्टाचाराच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढावे लागणार आहे, असं आवाहनही मोदींनी देशवासियांना केलं. आपल्याकडे 75 वर्षांचा अनुभव आहे, अनेक वर्षांमध्ये आपण अनेक गोष्टी मिळवल्या आहेत. नवे संकल्प सुद्धा केले आहे. आता अमृतमहोत्सवासाठी आपल्याला पुढे जायचं आहे. आज न्यायालयांमध्ये महिला लढत आहे. लोकप्रतिनिधींमध्ये महिला मोठ्या उत्साहाने काम करत आहे. आज पोलिसांमध्ये महिला लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत आहे. भारतीय नारीशक्ती पूर्ण विश्वासाने पुढे येत आहे. येणाऱ्या 25 वर्षांमध्ये आपल्या माता आणि भगिनींसाठी आपण काम करणार आहोत. यावर आपण जितकं लक्ष देऊ तितके ते देशाला काही देतील, असं म्हणत मोदींनी नारीशक्तीचे कौतुक केलं.
First published:

पुढील बातम्या