मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुस्लीम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू तरुणाची हत्या करून मृतदेह नदीत फेकला, आरोपींची कबुली

मुस्लीम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू तरुणाची हत्या करून मृतदेह नदीत फेकला, आरोपींची कबुली

अटकेत असलेल्या आरोपींनी खूनाची कबुली दिली आहे. मृतदेह गोदावरी नदीपात्रात फेकला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (Murder of Hindu Youth)

अटकेत असलेल्या आरोपींनी खूनाची कबुली दिली आहे. मृतदेह गोदावरी नदीपात्रात फेकला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (Murder of Hindu Youth)

अटकेत असलेल्या आरोपींनी खूनाची कबुली दिली आहे. मृतदेह गोदावरी नदीपात्रात फेकला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (Murder of Hindu Youth)

अहमदनगर 13 सप्टेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात मुस्लीम तरूणीशी विवाह करणाऱ्या हिंदू तरूणाचं अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर कुटुंबीयांनी घातपाताचा संशयव्यक्त केल्यानंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं होतं. आता या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या तरूणाची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. अपहरण झालेल्या युवकाचा आरोपींनी खून केल्याचं निष्पन्न झालं आहे. प्रियकरासोबत भांडण, लग्नासही मिळाला नकार; लोणावळ्यातील तरुणीने उचललं भयानक पाऊल अटकेत असलेल्या आरोपींनी खूनाची कबुली दिली आहे. मृतदेह गोदावरी नदीपात्रात फेकला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 31 ऑगस्ट रोजी दिपक बर्डे या तरूणाची निर्घृण हत्या करून मृतदेह नदीत फेकला गेला. दीपक बर्डे हा आदिवासी तरुण श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील रहिवासी होता. त्याने मुस्लीम मुलीशी लग्न केल्यानंतर त्याचं अपहरण झालं होतं. आता गोदावरी नदीपात्रात मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणात सात आरोपीना पोलिसांनी अटक केलेली आहे. अटकेत असलेल्या आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे. मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू तरुणाचे अपहरण, आठ दिवसांपासून बेपत्ता, घातपाताचा संशय काय आहे प्रकरण - श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे राहणारा दिपक बर्डे या आदिवासी भिल समाजाच्या तरूणाचे मुस्लिम मुलीशी प्रेम जुळलेले होते. या संबधाला मुलीच्या घरच्यांचा मात्र तीव्र विरोध होता. दोघेही सज्ञान असल्याने घरच्यांच्या अपरोक्ष दोघांनी दोन महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली आणि आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाकाही घेतल्या. या दरम्यान मुलीच्या कुटुंबियांनी दिपकला मारहाण आणि दमदाटी करत तिला परत घरी नेले होते. त्यानंतर आपली पत्नी पुण्यात तिच्या मामाच्या घरी असल्याचं कळल्यानंतर 30 ऑगस्टला दिपकने घरच्यांना आपल्या मित्रासोबत नोकरी शोधायला पुण्याला चाललो असल्याच सांगत पुणे गाठले. मात्र, पत्नीला भेटण्याच्या आतच दिपकचं अपहरण झालं होतं.
First published:

Tags: Crime news, Murder

पुढील बातम्या