जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू तरुणाचे अपहरण, आठ दिवसांपासून बेपत्ता, घातपाताचा संशय

मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू तरुणाचे अपहरण, आठ दिवसांपासून बेपत्ता, घातपाताचा संशय

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

अहमदनगरमध्ये मुस्लिम तरूणीशी विवाह करणाऱ्या तरूणाचे अपहरण करण्यात आले असून त्याचा घातपात केल्याचा संशय आहे.

  • -MIN READ Ahmadnagar,Maharashtra
  • Last Updated :

अहमदनगर, 7 सप्टेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मुस्लिम तरूणीशी विवाह करणाऱ्या तरूणाचे अपहरण करण्यात आले असून त्याचा घातपात केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र तरूणाचा अजून काहीही ठावठिकाणा लागला नाहीय. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका लव्ह जिहादच्या घटनेने चर्चेत आलेला असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे राहणारा दिपक बर्डे या आदिवासी भिल समाजाच्या तरूणाचे मुस्लिम मुलीशी प्रेम जुळलेले होते. या संबधाला मुलीच्या घरच्यांचा मात्र तीव्र विरोध होता. दोघेही सज्ञान असल्याने घरच्यांच्या अपरोक्ष दोघांनी दोन महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली आणि आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाकाही घेतल्या. या दरम्यान मुलीच्या कुटुंबियांनी दिपकला मारहाण आणि दमदाटी करत तिला परत घरी नेले होते. त्यानंतर आपली पत्नी पुण्यात तिच्या मामाच्या घरी असल्याचं कळल्यानंतर 30 ऑगस्टला दिपकने घरच्यांना आपल्या मित्रासोबत नोकरी शोधायला पुण्याला चाललो असल्याच सांगत पुणे गाठले. पत्नीला भेटण्याच्या आतच दिपकला मुलीच्या मामाने गाठले आणि त्याला मारहाण करत त्याचे अपहरण केले असल्याचा दावा दिपकच्यासोबत असलेल्या मित्राने केला आहे. ( मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस, ऑफिसमधून निघण्याआधी पाहा Traffic Update ) मुलीच्या मामाने भोकर गावात राहणाऱ्या मुलीच्या पालकांच्या ताब्यात दिपकला दिले आणि त्याचा घातपात केल्याची तक्रार दिपकच्या वडिलांनी श्रीरामपूर तालूका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मजनू बबन शेख, इमरान अब्बास शेख, समीर अहमद शेख, अजित बबन शेख यांना ताब्यात घेतले आहे. मात्र आमचा मुलगा कुठे आहे, त्याचा शोध पोलीस कधी घेणार? असा सवाल दिपकच्या वडिलांनी उपस्थित केलाय. “माझ्या मुलाला या लोकांची खूप भीती वाटत होती. मात्र मी रात्री जावून परत येईल, असं सांगून घरातून बाहेर पडलेला माझा मुलगा अजून परतला नाही. या लोकांना काय तलवारी काढण्याचा परवाना दिला गेलाय का? आमचा एकुलता एक मुलगा होता. तो कुठं गेलाय, त्याचं काय झालंय?”, अशी शब्दांनी पीडित मुलाची आई हळहळली. “हिंदूची मुलगी जर तुम्ही नेली तर तुमच्या धर्माला योग्य.. आणि हिंदू मुलाने मुस्लीम मुलीशी लग्न केलं तर ते गैर कसं? चुक काय एकट्या आमच्या मुलाने केली होती का? मुलगीही त्यात सामील होती. जर आरोपी पकडले गेले तर आमचा मुलगा का सापडत नाही? त्याचा या लोकांनी घातपात केला”, असा संशय मुलाच्या नातेवाईकांनी केलाय. “आठ दिवस उलटून गेले आहेत. मात्र दिपकचा कोणताही ठावठिकाणा लागत नाहीय. आता कुटुंबियांचा संयम सुटत चाललाय. जर लवकर त्याचा तपास लावला नाही आणि दोषींवर कारवाई केली गेली नाही तर तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे”, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात