जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / प्रियकरासोबत भांडण, लग्नासही मिळाला नकार; लोणावळ्यातील तरुणीने उचललं भयानक पाऊल

प्रियकरासोबत भांडण, लग्नासही मिळाला नकार; लोणावळ्यातील तरुणीने उचललं भयानक पाऊल

प्रियकरासोबत भांडण, लग्नासही मिळाला नकार; लोणावळ्यातील तरुणीने उचललं भयानक पाऊल

लोणावळ्यातील रामनगर येथे प्रेमविवाह करण्याचं स्वप्न पाहिलेल्या तरुणीने आत्महत्या केली आहे. परभणी येथील तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. (Girl Commit Suicide)

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

गणेश दुडम, प्रतिनिधी 

लोणावळा 13 सप्टेंबर : ऐनवेळी प्रियकर किंवा प्रेयसीकडून लग्नास नकार मिळाल्यावर अनेकजण नैराश्यात जातात. मात्र, काही लोक असेही असतात ज्यांना हे सगळं सहन होत नाही आणि ते टोकाचं पाऊल उचलतात. लग्नास नकार मिळाल्याने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना लोणावळ्यातून समोर आली आहे. शिक्षकाचं राक्षसी कृत्य; ‘या’ कारणामुळे 7 वर्षीय विद्यार्थ्याच्या अंगावर फेकलं उकळतं पाणी लोणावळ्यातील रामनगर येथे प्रेमविवाह करण्याचं स्वप्न पाहिलेल्या तरुणीने आत्महत्या केली आहे. परभणी येथील तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीवरुन लग्नास नकार मिळाल्याने तिने हे पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं आहे, अशी माहिती लोणावळा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळं लोणावळ्यातील रामनगर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील रामनगर येथील या तरुणीचे परभणीमधील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. दोघं लग्नही करणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्यामध्ये काही कारणावरुन वाद झाला. यानंतर तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. पोलीस आणि कुटुंबीयांनी अडीच महिने घेतला बेपत्ता तरुणाचा शोध, अखेर घरातच सापडला पुरलेला मृतदेह प्रियकराकडून मिळालेला हा नकार सहन न झाल्यानं या तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं. लग्नास नकार देत हा तरुण युवतीसोबत वाद घालत होता. प्रेमभंग झाल्याने नैराश्यातून तरुणीनं हे पाऊल उचललं, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत असून लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात