जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'भाजपला आता जाणवलंय की आपण एकमेकांना...'; महायुतीच्या चर्चांवरुन जयंत पाटलांचा टोला

'भाजपला आता जाणवलंय की आपण एकमेकांना...'; महायुतीच्या चर्चांवरुन जयंत पाटलांचा टोला

फाईल फोटो

फाईल फोटो

भाजप, मनसे आणि शिंदे गटाच्या महायुतीबाबतच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, की आपण एकमेकांना पुरणार नाही, इतके अपुरे असल्याचं भाजपला जाणवत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

शिर्डी 26 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाडव्याच्या निमित्ताने साईदर्शन घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी सरकारने जनतेच्या हिताची कामे करावी, असा सल्ला दिला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोलाही लगावला. मुंबईत गणपती उत्सवात ज्या जाहिराती केल्या होत्या त्यावेळी सर्वच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचे एकत्रित फोटो होते. मात्र दिवाळीच्या ज्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यात एकनाथ शिंदे यांचा फोटो कुठेच दिसत नाही. फक्त भाजप नेत्यांचे फोटो आहेत. त्याची नोंद शिंदे घेतील अशी अपेक्षा आहे, असा मिश्किल टोला जयंत पाटलांनी यावेळी लगावला. Aditya Thackeray : ‘खोके सरकार’ नंतर आता ‘घोषणा सरकार’ आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर फटकेबाजी भाजप, मनसे आणि शिंदे गटाच्या महायुतीबाबतच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, की आपण एकमेकांना पुरणार नाही, इतके अपुरे असल्याचं भाजपला जाणवत आहे. त्यामुळे मिळेल त्यांना एकत्रित घेण्याचा त्यांचा प्र‌यत्न आहे, असा टोला महायुतीवरून जयंत पाटलांनी भाजपला लगावला आहे. सर्व राजकारण्यांनी सुडाच राजकारण टाळलं पाहिजे. व्यक्तिगत निंदा थांबवली पाहिजे. व्यक्तिगत द्वेष बुद्धीने बोलणं टाळलं पाहिजे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत यापुर्वी असं नव्हतं, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. शिवसेना, भाजप आणि मनसे महायुती होणार का? मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात दिलं उत्तर राज्य सरकारबाबत बोलताना ते म्हणाले, की सरकारने जनतेच्या हिताचं राज्य करावं आणि ते करतील अशी अपेक्षा आहे. आम्ही विरोधी पक्षात असलो ‌तरी जनतेचं हित महत्वाचं आहे. त्यामुळे या सरकारने जनतेच्या हिताची कामं करावी, असं ते म्हणाले. महाराष्ट्रात लाखो शेतक-यांवर दिवाळी अगोदर मोठं संकट आलं आहे. त्यातून पुन्हा उभा राहण्याची ताकद त्यांना द्यावी अशी मागणी साईबाबांकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात