अहमदनगर, 10 जुलै : अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीतील अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे आमादर रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. भाजपनंच पक्ष फोडल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता रोहित पवार यांच्या या आरोपाला छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नेमकं काय म्हणाले भुजबळ? भाजपचं मुंडे कुटुंब देखील याच लोकांनी फोडलं होतना? धनंजय मुंडे यांना दूर करणारे तुम्हीच होताना असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान शरद पवार यांची येवल्यात सभा झाली. याच दरम्यान त्यांचा एक पावसात भिजल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवर देखील छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पावसात आम्हीही भिजतो. साहेबांचं वय झालं आहे, आजारपण आहे, त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळते. आम्ही सुद्धा शिवसेनेत असताना पहाटेपर्यंत काम करायचो. मागच्या निवडणुकीत सुद्धा प्रचंड पावसात आम्ही बैठका घेतल्या. हा काही नवीन भाग नाही असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
…म्हणून साहेबांना पावसात भिजल्यावर सहानुभूती मिळते; भुजबळ स्पष्टच बोललेरोहित पवार काय म्हणाले होते? अजित पवार यांच्याकडे सर्वाधिक पोटेंशिइल आहे. भाजपवाले लोकनेत्यांना जवळ घेतात आणि नंतर त्यांना संपवतात. मला भीती वाटते की भाजपवाले अजित पवार यांची देखील ताकद कमी करतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.