अहमदनगर, 10 जुलै, हरिष दिमोटे : अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. या दौऱ्यातील त्यांची पहिली सभा भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात पार पडली. यावेळी शरद पवार यांचा पुन्हा एकदा पावसात भिजलेला फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. नेमकं काय म्हणाले भुजबळ? पावसात आम्हीही भिजतो. साहेबांचं वय झालं आहे, आजारपण आहे, त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळते. आम्ही सुद्धा शिवसेनेत असताना पहाटेपर्यंत काम करायचो. मागच्या निवडणुकीत सुद्धा प्रचंड पावसात आम्ही बैठका घेतल्या. हा काही नवीन भाग नाही असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. भुजबळ नाशिकहून पुण्याकडे निघाले होते, यावेळी त्यांचं संगमनेरमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. त्यावेळी भुजबळ बोलत होते.
Uddhav Thackreay : जे बोगस बियाण होतं ते गेलं आता..; अमरावतीच्या सभेत उद्धव ठाकरेंचा निर्धार, भाजपवर जोरदार हल्लाबोलदरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपनं राष्ट्रवादी फोडल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यावर बोलताना भाजपचं सुद्धा मुंडे कुटुंब या लोकांनी फोडलं होतं. धनंजय मुंडेंना तुम्हीच दूर केलं होतना असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.