अहमदनगर, 2 जुलै: आपल्यातील बऱ्याच जणांना लॅब्रेडोर, डॉबरमॅन, जर्मन शेपर्ड, गोल्डन रिट्रीव्हर तसेच रोटवेईलर यांसारखे विविध जातींचे कुत्रे पालनाचा छंद असतो. मात्र या विदेशी जातींचे कुत्रे पालनासाठी किती खर्च येतो? याबद्दल आपल्या मनात प्रश्न असतात. जाणून घेऊयात विविध जातींच्या कुत्र्यांना पालनासाठी साधारण किती खर्च येतो. प्रत्येक श्वानासाठी खर्च वेगळा पाच वेगवेगळ्या जातींचे कुत्रे पालनासाठी साधारण पाच ते सहा हजारापर्यंत मासिक खर्च येतो. मात्र खाद्यांच्या प्रकारानुसार यामध्ये बदल होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात. श्वानप्रेमी आवड म्हणून किंवा रक्षणासाठी वेगवेगळ्या जातींचे कुत्रे पाळत असतात. या प्रत्येक कुत्र्याचे ज्याप्रमाणे वय, उंची, रंग आणि स्वभाव वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे या कुत्र्यांची किंमत देखील वेगवेगळी असते. त्यांच्या पालनासाठी येणारा खर्च वेगवेगळा असतो.
लॅब्रेडोरला किती येतो खर्च? लॅब्रेडोर ही एक श्वानांतील प्रसिध्द जात आहे. लॅब्रेडोर प्रेमळ, कार्यक्षम, शांत, बुध्दिमान, सभ्य एक चांगला सोबती आणि सगळ्यांना भुरळ पाडणारा असा असतो. हा कुत्रा आकाराने मोठा असतो व त्याचे आयुष्य 10 ते 12 वर्ष इतके असते. काही ठिकाणी लॅब्रेडोर हे थेरपी डॉग म्हणून वापरले जातात. तर काही ठिकाणी त्यांचा वापर खेळामध्ये किंवा शिकार करण्यासाठीही होतो. ही जात पालनासाठीचा मासिक खर्च पाच ते सहा हजारापर्यंत येऊ शकतो. डॉबरमॅनसाठी खर्च डॉबरमॅन ही एक जर्मन कुत्र्याची जात आहे आणि हा कुत्रा आपल्या घराची राखण चांगल्या प्रकारे करू शकतो. हा कुत्रा निर्भय, आज्ञाधारक, हुशार, दक्ष, निष्टावंत, बुध्दिमान आणि अति सक्रीय कुत्रा आहे. त्याची वाढ खूप कमी वेगाने होते व ते पहिले तीन चार वर्ष कुत्र्याच्या पिल्लासारखेच असतात. या कुत्र्यांना प्रशिक्षण देणे खूप सोपे असते कारण ते पटकन शिकतात. काही लोकांना डॉबरमॅन हा कुत्रा संरक्षनाच्या हवा असतो तर काहींना घराची राखण करण्यासाठी हवा असतो. या कुत्र्यांचे आयुष्य 10 ते 13 वर्ष इतके असते. डॉबरमॅन पालनासाठीचा मासिक खर्च पाच ते सहा हजारापर्यंत जाऊ शकतो. तुमच्या कुत्र्याला पाणी पिता येत नाहीय? वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी दिला गंभीर सल्ला जर्मन शेफर्ड जर्मन शेफर्ड या कुत्र्याची उत्पत्ती जर्मनीमध्ये झाली. जर्मन शेफर्ड ह्या जातीचे कुत्रे आकाराने मोठे सामर्थ्यवान आणि आक्रमकही असतात. त्यांचे आक्रमक वर्तन टाळण्यासाठी त्यांना लहानपणा पासूनच प्रशिक्षण दिले पाहिजे. तसेच त्यांना आज्ञाधारक पनाचे हि प्रशिक्षण दिले पाहिजे. ह्या जातीचे कुत्रे खूप शूर, दक्ष, जिज्ञासू आणि हुशार असतात. त्यांना रोज व्यायामाची गरज असते नाही तर ते उच्चशक्ती बनू शकतात (त्यांची आक्रमक वृत्ती नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना रोज व्यायाम हा आवश्यक असतो). जर्मन शेपर्ड चे आयुष्य १० ते १३ वर्ष इतके असते. या कुत्र्याच्या पालनासाठी मासिक खर्च साधारण 5 ते 6 हजारापर्यंत येऊ शकतो. गोल्डन रिट्रीव्हर गोल्डन रिट्रीव्हर ही अमेरिकेतील एक लोकप्रिय जात आहे. हे कुत्रे हुशार, दयाळू, बुद्धिमान आणि सहनशील वृत्तीचे असतात आणि याच सहनशील वृत्तीमुळे लोक त्यांना आपला कौटुंबिक पाळीव प्राणी म्हणून पसंत करतात. त्यांची बुद्धिमत्ता चांगली असल्यामुळे ते अतिशय कार्यक्षम असतात. गोल्डन रिट्रीव्हर चा वापर पाठलाग करण्यासाठी शिकार करण्यासाठी किवा थेरपी डॉग म्हणून करतात. तसेच हा कुत्रा क्रीडापटू म्हणूनही आपले कार्य बजावतो. याही जातीचा कुत्रा पालनासाठी मासिक खर्च पाच ते सहा हजारापर्यंत येऊ शकतो. रात्रीच्या वेळी कुत्री का रडतात? त्यांना असं काय दिसतं? काय आहे कारण? रोटवेईलर रोटवेईलर हा हुशार, उत्साही, दक्ष, न घाबरणारा आणि एक चांगला संरक्षक असतो. रोटवेईलर या कुत्र्यांना रोटी (rottie) किंवा रोट ( rott) या नावांनीही बोलवले जाते. या कुत्र्यांचे आयुष्य 8 ते 11 इतके असते व ते आकाराने सुधा मोठे असतात. या कुत्र्याच्या पालनासाठी मासिक खर्च साधारण पाच ते सहा हजारापर्यंत येऊ शकतो. प्रत्येक जातीचा कुत्रा पालनासाठी 5 ते 6 हजार रुपये दरमहा लागू शकतात असं तज्ज्ञांच मत आहे. मात्र हा खर्च पूर्णपणे खाद्यावर अवलंबून असतो, खाद्याच्या प्रकारात बदल केला तर हा खर्च कमी जास्त होऊ शकतो.