अहमदनगर, 23 मार्च : अहमदनगर-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. नगर तालुक्यातील कामरगावाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातात 4 ठार तर 11 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. गुढी पाडव्यादिवशी देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा हा अपघात झाला आहे.
काल मध्यरात्री गावाकडे निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आहेत. नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर आणि देवगड येथे दर्शन घेऊन ते गावी परतत होते.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील आमदाबाद आणि चिंचोली मोर या गावातील 16 असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.दरम्यान देवदर्शनासाठी अहमदनगर पुणे मार्गावर एका टेम्पोमधून प्रवास करत होते. नगर-पुणे महामार्गावर कामगार गावाजवळ पुण्याकडून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या टेम्पोला धडक दिली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक टेम्पोवर येऊन आदळल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान झालेल्या भीषण अपघातात राजेंद्र साळवे, विजय अवचिते, धीरज मोहिते, मयूर साळवे यांचा मृत्यू झाला. जखमींना नगर शहरातील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
6 मुलांची आई, वय 50 अन् 30 वर्षांच्या भाच्यासोबत जुळलं सूत; वाचा, पुढे काय घडलं?अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि नंतर पोलीसही मदतीला धावले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात चार जण ठार झाले असून त्यामध्ये एका बालकाचाही समावेश आहे.