छत्रपती संभाजीनगर, 23 मार्च, अविनाश कानडजे : पैठण तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने आपल्या मुलाच्या विरहात गळफास घेऊन आपलं जीवनं संपवलं. दोन मार्च रोजी मुलाने आत्महत्या केली होती. मुलाचा विरह सहन न झाल्यानं अखेर आईने देखील गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेनं तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
शिवणाईमधील घटना
अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शिवणाईमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. मुलाच्या विरहात आईने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन मार्च रोजी मुलगा रितेश काळे याने आत्महत्या केली होती. मात्र मुलाच्या मृत्यूचा मोठा धक्का या मातेला बसला होता. मुलाचा विरह सहन न झाल्यानं मातेनं देखील टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. रुख्मणबाई रमेश काळे असं या महिलेचं नाव आहे. त्यांनी आपल्या राहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
घटनेनं परिसरात हळहळ
काही दिवसांपूर्वीच मुलाचं निधन झालं होतं. मात्र मुलाच्या निधनाचा धक्का सहन न करू शकल्यानं, रुख्मणबाई यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. महिन्याच्या आतच आई आणि लेकाचा मृत्यू झाल्यानं तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news