जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेनेनंतर पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव; रोहित पवारांचा धक्कादायक आरोप

शिवसेनेनंतर पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव; रोहित पवारांचा धक्कादायक आरोप

शिवसेनेनंतर पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव

शिवसेनेनंतर पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव

शिवसेना पक्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑक्टोबर : शिवसेना पक्ष फोडल्यानंतर आता विरोधकांचे पुढील टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यासाठी पवार कुटुंबात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचेही रोहीत पवार म्हणाले. एबीपी माझा या वृत्त वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रीयेत ते बोलत होते. दरम्यान, यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ दोन महिन्यापूर्वी शिवसेना पक्षात उभी फूट पडल्याने ठाकरे कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बाहेर पडून भाजपशी हातमिळवली केली होती. यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा द्यावा लागल्याने महाविकासआघाडी सरकार कोसळलं होतं. या सर्व घडामोडीनंतर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले. दरम्यान, पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे कुटुंबात देखील फूट पडल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे कुटुंबातील अनेक सदस्य शिंदे गटाच्या स्टेजवर पाहायला मिळाले. यानंतर आता पवार कुटुंबाताही अशीच फूट पाडण्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. वाचा - टोकाचे विरोधक येणार एकत्र! MCA निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची डिनर डिप्लोमसी शिवसेना पक्षानंतर आता विरोधकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडण्याचा डाव असल्याचा आरोप रोहीत पवार यांनी केला आहे. विरोधक पवार कुटुंबात फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. मात्र, काहीही झाले तरी पवार कुटुंबात फूट पडणार नसल्याचा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. खासदार सुप्रिया सुळे केंद्रात आहेत, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आम्ही राज्यात आहोत, त्यामुळे संघर्ष होण्याचं कारण नसल्याचं रोहित पवार यांनी सांगितले.

News18लोकमत
News18लोकमत

रोहितशी बोलावं लागेल : अजित पवार रोहित पवार यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता रोहितशी बोलावं लागेल. त्यानं नेमकं कशामुळे वक्तव्य केलं हे पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. अनेकदा माध्यमांमध्ये वक्तव्याचा विपर्यास होत असल्याचेही पवार म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात