मुंबई, 13 डिसेंबर : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हे प्रकरण ताजं असतानाच आता भाजप नेते प्रसाद लाड यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रसाद लाड यांचे पुतणे वरुण लाड यांच्या फोनवर प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार
भाजप नेते प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रसाद लाड यांचे पुतणे वरुण लाड यांच्या फोनवर अज्ञाताने फोन करून लाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आता या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. शरद पवार यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली
शरद पवार यांना धमकी
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. शरद पवार याचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत फोन लोकेशन ट्रेस केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धमकी देणारा हा व्यक्ती बिहारचा असून, त्याने यापूर्वी देखील एकदा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या प्रकरणात त्याला ताब्यात देखील घेण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, NCP, Sharad Pawar