जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sharad Pawar : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली

Sharad Pawar : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली

शरद पवार

शरद पवार

मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 डिसेंबर :  मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी फोन करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली असून, कॉल करणाऱ्याची ओळख पटवण्यात आली आहे. तर दुसरीकडे फोन करणारा व्यक्ती हा वेडा असल्याचा दावा शरद पवार यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.   ‘फोन करणारा व्यक्ती वेडसर’ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना  जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार याच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या वृत्ताने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी धमकीचा कॉल करणाऱ्यांची ओळख पटवली आहे. तर दुसरीकडे  हा व्यक्ती वेडा असल्याचा दावा शरद पवार यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. यापूर्वीही दिली होती धमकी  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने सिल्व्हर ओक’ वर फोन करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीचे लोकेशन ट्रेस करण्यात आले असून, हा व्यक्ती बिहारचा असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी देखील याच व्यक्तीने एकदा शरद पवार यांना धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात