जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पतीच्या निधनानंतर आठ दिवसांतच हरली हिंमत, विवाहितेनं चिमुकलीसह केला हृदयद्रावक शेवट

पतीच्या निधनानंतर आठ दिवसांतच हरली हिंमत, विवाहितेनं चिमुकलीसह केला हृदयद्रावक शेवट

(File Photo)

(File Photo)

Murder and Suicide in Wardha: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका महिलेनं पतीच्या मृत्यूनंतर आठ दिवसातच आपल्या कुटुंबाचा हृदयद्रावक पद्धतीने शेवट केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वर्धा, 01 ऑक्टोबर: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका महिलेनं पतीच्या मृत्यूनंतर आठ दिवसातच आपल्या कुटुंबाचा हृदयद्रावक पद्धतीने शेवट केला आहे. महिलेनं आपल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या (daughter’s brutal murder) केल्यानंतर, स्वत:ही गळफास घेत जीवन संपवलं (Married woman commits suicide) आहे. अवघ्या आठच दिवसांत कुटुंबाचा सर्वनाश झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. कविता मोहदुरे (वय- 35) असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे, तर आराध्या मोहदुरे असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. मृत कविता मोहदुरे यांच्या पतीने आठ दिवसांपूर्वी गावातील एका विहिरीत उडी घेत आत्महत्या केली होती. पतीने अचानक उचललेल्या टोकाच्या पाऊलामुळे कविता यांना धक्का बसला होता. हेही वाचा- व्यायाम करताना घडलं भलतंच; सांगलीत बड्या डॉक्टरचा जिममध्येच मृत्यू मृत कविता या आपली अडीच वर्षांची मुलगी आराध्या आणि पतीसह वर्धा येथे वास्तव्याला होत्या. दरम्यान आठ दिवसांपूर्वी पतीने आत्महत्या केल्यानंतर, त्या आपल्या अडीच वर्षाच्या मुलीला घेऊन आईकडे हिंगणघाट येथील आशिषनगर येथे राहायला गेल्या होत्या. पण पतीच्या विरहामुळे त्यांना मानसिक त्रास होता. या तणावातून कविता यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा गावात आहे. हेही वाचा- रात्री आईला बोलून दाखवली खंत, सकाळी आढळला मृत, MPSCच्या विद्यार्थ्याची आत्महत्या नेमकं काय घडलं? मृत कविता यांनी गुरुवारी सायंकाळी आपल्या अडीच वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या आठच दिवसांत कुटुंबाचा सर्वनाश झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात