सांगली, 01 ऑक्टोबर: गेल्या काही महिन्यांत जिममध्ये व्यायाम करत असताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यानंतर आता सांगलीतील (Sangli) एका शल्यचिकित्सकाने आपला जीव गमवला (death while exercising) आहे. बुधवारी सायंकाळी व्यायाम करण्यासाठी ते जिममध्ये गेले असता, त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं (Doctor died in gym) आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. डॉ. अशोक धोंडे असं मृत पावलेल्या 47 वर्षीय डॉक्टरचं नाव असून ते शल्यचिकित्सक होते. दरम्यान बुधवारी सायंकाळी मृत डॉ. धोंडे हे नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये गेले होते. जिममध्ये काही काळ व्यायाम केल्यानंतर त्यांना थकवा जाणवायला सुरू झाला. त्यामुळे त्यांनी थोडीशी विश्रांती घेतली. पण त्यानंतर त्यांना आणखी अस्वस्थ वाटू लागलं. यामुळे जिममधील काहीजणांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. हेही वाचा- रात्री आईला बोलून दाखवली खंत, सकाळी आढळला मृतावस्थेत, औरंगाबादेत MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या रुग्णालयात दाखल करेपर्यंत खूप उशीर झाला होता. याठिकाणी पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं आहे. व्यायामासाठी गेलेल्या एका वरिष्ठ डॉक्टरचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री त्यांच्यावर शवविच्छेदन केल्यानंतर, सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक डॉक्टर याठिकाणी उपस्थित होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.