भाजपला धक्का, फडणवीसांचे निकटवर्तीय खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर - सूत्र

भाजपला धक्का, फडणवीसांचे निकटवर्तीय खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर - सूत्र

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय खासदार संजय काकडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे.

  • Share this:

पुणे, 26 फेब्रुवारी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय खासदार संजय काकडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे. पवारांकडून आपल्याला निमंत्रण आल्याची माहिती काकडे यांनी दिली आहे. संजय काकडे जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी संजय काकडे यांनी उदयनराजेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि या जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हेही पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी उदयनराजें भोसले यांच्यावर टीका करत भाजपच्या उमेदवारीवर दावा ठोकलाय. मात्र गेल्या काही वर्षात त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं करत भाजपला अडचणीत आणलं होतं.

(हेही वाचा- फडवणीस यांची प्रश्नांची गुगली, अजित पवारांनी आदित्य ठाकरेंना वाचवलं)

त्यामुळे त्यांना तिकिट मिळण्याची शक्यता कमी आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत पराभव झाल्यानंतर भाजपकडून उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्याचा मानस असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. उदयनराजेंच भाजपसाठी काय योगदान आहे, असा सवाल संजय काकडेंनी उपस्थित केल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.

(हेही वाचा-भाजपने आणलेला सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभेत फेटाळला)

गेल्यावर्षी देखील संजय काकडे राष्ट्रवादीत जाणार या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काकडेंची मनधरणी केली होती. आता पुन्हा एकदा काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते आहे. अशावेळी पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First published: February 26, 2020, 1:53 PM IST

ताज्या बातम्या