फडणवीस यांच्या प्रश्नांच्या गुगलीवर अजित पवारांनी आदित्य ठाकरेंना वाचवलं

फडणवीस यांच्या प्रश्नांच्या गुगलीवर अजित पवारांनी आदित्य ठाकरेंना वाचवलं

फडणवीसांनी अडचणीत आणणारा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला त्यानंतर ते गोंधळणार हे दिसताच संसदीय राजकारणात मुरलेले अजित पवार मदतीसाठी उभे राहिले.

  • Share this:

मुंबई 26 फेब्रुवारी : कोकणातल्या पर्यंटनावर विधानसभेत तारांकित प्रशनोत्तरावर आज विधानसभेत चर्चा झाली. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना गुगली टाकला. आदित्य अडचणीत येणार असं दिसताच अजित पवार हे आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावून गेले. चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पर्यटन पायाभूत सुविधा आणि प्रत्यक्ष पर्यटन निधी यावर प्रश्न विचारले. आदित्य ठाकरे यांना सभागृहात प्रथमच आज मंत्री म्हणून उत्तर देत होते. याच प्रश्नावर भास्कर जाधव, वैभव नाईक यांनी प्रश्न विचारले त्यास व्यवस्थित उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं. पण फडणवीस यांनी थेट पायाभूत सुविधा आणि मूळ पर्यटन विकास निधी यावर अधारित अडचणीत आणणारा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला त्यानंतर ते गोंधळणार हे दिसताच संसदीय राजकारणात मुरलेले अजित पवार मदतीसाठी उभे राहिले.

आता आदित्य ठाकरे काय बोलणार हे सभागृहात सगळ्यांना पाहायचे होते पण आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताना गडबड होईल की काय याचा अंदाज घेत थेट अजित पवार उभे राहत आदित्य ठाकरे यांच्या ऐवजी उत्तर द्यायला उभे राहिले. आदित्य ठाकरे यांची कोंडीत पकडण्याची संधी असतानाच थेट अजित दादांनी उत्तर देत विषयावर पडदा टाकण्यात यश मिळवलं.

अजित पवार म्हणतात, सावकरांचं योगदान नाकारू नका; तर काँग्रेस मंत्र्यांचं अभिवादन

आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर टीका

राज्याचे पर्यटनमंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. फडणवीसांनी शिवसेनेवर जी टीका केली होती त्यावरून आदित्य यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावरच्या भाषणात केलं होतं त्यावरून आदित्य यांनी निशाणा साधलाय.

'बांगड्या' वक्तव्यावरून माफी मागा, आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर टीका

माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं वक्तव्य शोभत नाही असंही ते म्हणाले. आदित्य ठाकरे म्हणाले, देवेंद्रजी, सहसा मी टीकेला प्रत्युत्तर देत नाही. मात्र तुम्ही भाषणात शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील आम्ही नाही अशी टीका केली होती. बांगड्या हे काही कमकुवतपणाचं लक्षण नाही.त्याला कमी लेखू नका. महिला या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. राजकारण हे होत राहील. मात्र टीकेचा आणि चर्चेचा स्तर आपण राखला पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं वक्तव्य शोभणारं नाही. त्यामुळे तुम्ही माफी मागितली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

First published: February 26, 2020, 12:18 PM IST

ताज्या बातम्या