मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल पोलिसानंच काढले अपशब्द, ऑडिओ क्लिप व्हायरल

शिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल पोलिसानंच काढले अपशब्द, ऑडिओ क्लिप व्हायरल

शिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल पोलिस कर्मचाऱ्यानं अपशब्द काढल्यानं निर्माण झाला तणाव....

शिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल पोलिस कर्मचाऱ्यानं अपशब्द काढल्यानं निर्माण झाला तणाव....

शिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल पोलिस कर्मचाऱ्यानं अपशब्द काढल्यानं निर्माण झाला तणाव....

परभणी, 5 ऑगस्ट: छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांच्याबद्दल पोलिस कर्मचाऱ्यानं अपशब्द काढल्यानं पालम शहरासह परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसाच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे संतप्त शिवप्रेमींनी पालम तहसील आणि पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. यासगळ्या प्रकारावरून बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. शिवाजी महाराज आणि जिजाऊंबाबत बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करण्यात येत आहे. हेही वाचा...अयोध्या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांनाच भूमिपूजनाचं निमंत्रण, उद्धव ठाकरेंना टोला पालम पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या जगन्नाथ काळे या पोलिस कर्मचाऱ्यानं फोन वर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल अश्लील शब्द वापरले. पोलिस कर्मचाऱ्याच्या आवाजातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी. या मागणीसाठी पालम शहर व परिसरातील शिवप्रेमी नागरिकांनी मागणी केली. आपल्या मागणीसाठी या नागरिकांनी शहरातून मोर्चाही काढला. काय आहे प्रकरण? पालम पोलिस स्टेशनमधील कर्मचारी जगन्नाथ काळे याने छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या बद्दल अश्लील शब्द वापरत, शिवीगाळ केल्याचं ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे. सकाळपासून ही ऑडिओ क्लिप परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ऑडिओ क्लिपमुळे सगळीकडे तनाव निर्माण झाला आहे. आणि त्यातूनच अनेक शिवप्रेमी नागरिकांनी रस्त्यावर उतरत पालम शहर कडेकोट बंद करण्याची घोषणा केली आहे. सोबत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून प्रशासनाने नागरिकांच्या भावनांची दखल घ्यावी. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही यावेळी शिवप्रेमींनी दिला आहे. आपल्या मागण्याचे निवेदन पालम तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना देण्यात आलं आहे. हेही वाचा...कंगनाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाली..आधी वडिलांना विचारा 7 प्रश्नांची उत्तरं परभणी जिल्ह्यात कोरोणामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे पालम शहरातही अधिक कुमक रस्त्यावर उतरवण्यात आली आहे. परंतु परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलीस आणि प्रशासन शिवप्रेमींना समजावण्याच्या भूमिकेत असून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आले आहे. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. कारवाई करण्याचा आश्वासन दिल्याने, सध्यातरी शहर आणि परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
First published:

Tags: Marathwada, Parbhani news, Parbhani police

पुढील बातम्या