अयोध्या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांनाच भूमिपूजनाचं निमंत्रण, उद्धव ठाकरेंना टोला

अयोध्या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांनाच भूमिपूजनाचं निमंत्रण, उद्धव ठाकरेंना टोला

अयोध्या लढ्यात ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, अशा संत, महंत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच राममंदिर भूमिपूजनाचा निमंत्रण दिलं...

  • Share this:

जालना, 5 ऑगस्ट: अयोध्या लढ्यात ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, अशा संत, महंत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच राममंदिर भूमिपूजनाचा निमंत्रण दिलं, अशा शब्दात भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

अयोध्या येथील प्रभू श्रीराम जन्मभूमीवर मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) रावसाहेब दानवे यांनी जालना येथील राम मंदिरात आरती करून जल्लोष साजरा केला. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा...कंगनाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाली..आधी वडिलांना विचारा 7 प्रश्नांची उत्तरं

आपल्या देशातच नाही तर जगभरात जिथे जिथे हिंदू बांधव आहेत. त्यांचं श्रद्धास्थान म्हणजे श्रीराम. गेली अनेक वर्षे प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं, अशा प्रकारची इच्छा हिंदू बांधवांची होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं जिथे रामाचा जन्म झाला तिथेच राममंदिर व्हावं, असा ऐतिहातिक निकाल दिला.

अयोध्येत राममंदिरासाठी जे काही लढे लढले गेले, त्यात कारसेवक म्हणून माझाही प्रत्यक्ष सहभाग होता, 1990 आणि 1992 च्या लढ्यात उत्तर प्रदेशात गेलो होतो. तिथ कर्वीच्या तुरुगांत आम्हाला ठेवण्यात आलं होतं. आणि आज प्रत्यक्षात प्रभू रामचंद्राच्या मंदिरांची पायभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली असल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

दुसरीकडे, रामनगरी अयोध्येत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते राममंदिर भूमिपूजन सोहळा (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) पार पडला. भूमिपूजन सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे मुख्य पुजारी श्री गद्दीनशीन प्रेमदास महाराज यांच्यासोबत हनुमानाचं दर्शन घेतलं तसेच, यांनी मोदींना चांदीचा 'मुकुट' परिधान केला. मोदींसह यावेळी पूजेला सरसंघचालक मोहन भागवतही बसले होते. पूजा संपन्न झाल्यानंतर मोदींनी जनतेशी संवाद साधला.

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मला या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हायला मिळालं. सर्वांचे आभार, या का ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार झालो हे माझं भाग्य आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

हेही वाचा...PHOTOS: राम मंदिर भूमिपूजन सोहळा अयोध्येत, पाहा काय सुरू आहे संघ मुख्यालयाबाहेर

आज संपूर्ण भारत राममय आहे. सारा देश रोमांचित आहे. मन दीपमय आहे. देश भावुक झाला आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा आज संपली. कोट्यवधी लोकांचा कदाचित आजच्या दिवसावर विश्वास बसणार नाही की त्यांच्या हयातीत त्यांना आजचा हा दिवस दिसला. आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी अनेकांनी आपण सगळं काही समर्पित केला. आंदोलन झालं नाही असा एकही दिवस नव्हता. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं नाही असा देशात एक भूभाग नसेल. 15 ऑगस्टचा दिवस जसा त्या बलिदानांचं प्रतीक आहे. तसा राममंदिरासाठी वर्षानुवर्षं अनेक पिढ्यांनी अविरत एकनिष्ठपणे प्रयत्न केले. मी 120 कोटी देशवासीयांच्या वतीने मस्तक नमवून वंदन करतो, असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

Published by: Sandip Parolekar
First published: August 5, 2020, 3:14 PM IST

ताज्या बातम्या