सिंधुदुर्ग, 4 डिसेंबर : मनसे प्रमुख राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांचा हा दौरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कोकणातला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रमुख चेहरा असलेले नेते, मनसेचे राज्य सरचिटणीस, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या दौऱ्याला दांडी मारली आहे. राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात वैभव खेडेकर एकदाही दिसले नसल्यानं कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र आता यावर वैभव खेडेकर यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले खेडेकर?
मनसे प्रमुख राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असताना वैभव खेडेकर गैरहजर असल्यानं आता राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. ते नाराज असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र आता यावर खुद्द वैभव खेडेकर यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. इथल्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी केलेल्या केसेसमुळे आपल्याला पोलीस ठाण्यात दररोज हजेरी लावावी लागते. तसेच माझी एलएलबीची परीक्षा देखील सुरु आहे. या सर्व तारखा आणि दौऱ्याच्या तारखा एकाच दिवशी आल्यानं मला कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहाता आले नाही. मात्र उद्या राज ठाकरे हे दापोली विधानसभा मतदासंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी केली असून, मोठ्या जल्लोषात राजसाहेबांचं स्वागत करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : जळगावच्या राजकारणात रंगला 'कबड्डी' सामना, महाजन-खडसेंमध्ये डाव-प्रतिडाव
चर्चेला उधाण
राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्याला मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर गैरहज असल्यानं चर्चांना उधान आलं होतं. वेगवेगळे तर्क लावण्यात येत होते. मात्र आता यावर खुद्द खेडेकर यांनीच प्रतिक्रिया दिल्यानं चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, MNS, Raj Thackeray, Ratnagiri, Sindhudurg