मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जळगावच्या राजकारणात रंगला 'कबड्डी' सामना, महाजन-खडसेंमध्ये डाव-प्रतिडाव

जळगावच्या राजकारणात रंगला 'कबड्डी' सामना, महाजन-खडसेंमध्ये डाव-प्रतिडाव

एकनाथ खडसे, गिरीश महाजन

एकनाथ खडसे, गिरीश महाजन

एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांना जोरदार टोला लगावला आहे. गिरीश भाऊ जी कबड्डी शिकले, त्या कबड्डीचा मी अंपायर असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Ajay Deshpande

जळगाव, 4 डिसेंबर :  राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांना जोरदार टोला लगावला आहे. गिरीश भाऊ जी कबड्डी शिकले, त्या कबड्डीचा मी अंपायर असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.  कबड्डी खेळत असताना कोणाची टांग कशी खेचायची हे गिरीश महाजन उत्तमरित्या शिकले. मात्र त्यांना जी कबड्डी शिकवण्यात आली त्या कबड्डीचा मी  अंपायर राहिलेलो आहे. त्यामुळे जोपर्यंत मी बोट वर करणार नाही तोपर्यंत समोरचा आऊट आहे की जिंकला याचा निर्णयच होत नव्हता. शेवटी अंपायर तो अंपायर असतो आणि खेळाडू तो खेळाडूच असतो असा खोचक टोला एकनाथ खडसे यांनी महाजन यांना लगावला आहे.

काय म्हणाले खडसे? 

मी राजकारणात येण्यापूर्वी  कबड्डीचा खेळाडू होतो. त्यामुळे कोणाची टांग कशी खेचायची आणि कोणाला कधी मैदानाबाहेर काढायचे हे मला कबड्डी खेळताना चांगलं शिकायला मिळालं असं महाजन यांनी परभणीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं. यावरून एकनाथ खडसे यांनी आता गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे.   गिरीश भाऊ जी कबड्डी शिकले, त्या कबड्डीचा मी अंपायर असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.  कबड्डी खेळत असताना कोणाची टांग कशी खेचायची हे गिरीश महाजन उत्तमरित्या शिकले. मात्र त्यांना जी कबड्डी शिकवण्यात आली त्या कबड्डीचा मी  अंपायर राहिलेलो आहे असं खडसे यांनी म्हटलं.

हेही वाचा :  नागपुरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं 'हम साथ साथ है'; मालेगावात भाजप, शिंदे गटात दुफळी

निवडणुकीवरून निशाणा 

दरम्यान सध्या जळगाव जिल्हा दूधसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. यावरून देखील खडसे यांनी गिरीश माहजन आणि गुलाबराव पाटील यांना टोला लगावला आहे. गुलाबराव पाटील आणि गिरीश माहजन यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी जनतेच्या दारोदारी फिरावं लागत आहे, ही केविलवाणी स्थिती असल्यचं खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच ते सध्या ज्या पद्धतीने प्रचार करत आहेत, ते पाहून राज्यातील सर्व प्रश्न संपले की काय असं वाटत असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: BJP, Eknath khadse, Girish mahajan, Gulabrao patil, Jalgaon, NCP