Home /News /maharashtra /

कोकणात येत्या काही दिवसांत होणार राजकीय भूकंप; शिंदे-ठाकरे गटात रंगणार 'पोलखोल'

कोकणात येत्या काही दिवसांत होणार राजकीय भूकंप; शिंदे-ठाकरे गटात रंगणार 'पोलखोल'

कोणाची होणार पोलखोल?

    मुंबई, 6 ऑगस्ट : एकीकडे विरोधी पक्ष नेते मंत्रिमंडळ विस्तारावरुन राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. एकनाथ शिंदेंचा वेगळा गट निर्माण झाल्यानंतर आतापर्यंत शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शिवसेनेला राम राम ठोकला आहे. येत्या काही दिवसात कोकणातूनही अशाच बातम्या समोर येण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटातील काही माजी आमदार, स्थानिक नेते, पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ठाकरे गटातील एका आमदाराबाबत शिंदे गटातील आमदार पोलखोल करणार असल्याचीही चर्चा आहे. आता कोणाची पोलखोल होणार, याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही. मात्र जर ठाकरे गटातील आमदाराची पोलखोल झाली तर शिंदे गटातील आमदाराचीही पोलखोल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान,  भाजपने आतापासून बारामती लोकसभा मतदार संघ टार्गेट केल्याची माहिती समोर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तीन दिवसांच्या मुक्कामी येणार असल्याची माहिती भाजप नेते अविनाश मोटे यांनी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत सरकारविरोधात भरभरून टीक करीत असतात. यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही खासदार सुप्रिया सुळे यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सूचना केल्याची चर्चा होती. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांच्या सभाही झाल्या. मात्र बारामतीत सुप्रिया सुळे यांना भाजप उमेदवार हरवू शकले नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackarey

    पुढील बातम्या