Home /News /maharashtra /

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजपने दंड थोपटले; खुद्द केंद्रीय अर्थमंत्र्यांचंच केलं पाचारण

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजपने दंड थोपटले; खुद्द केंद्रीय अर्थमंत्र्यांचंच केलं पाचारण

पूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही खासदार सुप्रिया सुळे यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सूचना केल्याची चर्चा होती.

    पुणे, 6 ऑगस्ट : भाजपने आतापासून बारामती लोकसभा मतदार संघ टार्गेट केल्याची माहिती समोर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तीन दिवसांच्या मुक्कामी येणार असल्याची माहिती भाजप नेते अविनाश मोटे यांनी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत सरकारविरोधात भरभरून टीक करीत असतात. यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही खासदार सुप्रिया सुळे यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सूचना केल्याची चर्चा होती. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांच्या सभाही झाल्या. मात्र बारामतीत सुप्रिया सुळे यांना भाजप उमेदवार हरवू शकले नाही. आगामी 2024 च्या निवडणुकीसाठी मात्र भाजपने आतापासूनच सुरुवात केली आहे. बारामती हा राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला भेदण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची वर्णी लावण्यात आली आहे. सीतारामन यांच्यासमवेत दौऱ्यात विधान परीषदेचे आमदार तसेच बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी राम शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे हे नेते उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १६ ऑगस्टला खडकवासला आणि भोर येथे, १७ ऑगस्टला इंदापूर, दौंडला तर १८ ऑगस्टला त्या बारामती आणि पुरंदरला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडली. यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा आणि एनडीएचे जगदीप धनखड यांच्यात लढत झाली. पण या लढतीत भाजपच्या लोकसभा आणि राज्यसभेत सर्वाधिक जागा असल्याने जगदीप धनखड यांचा विजय निश्चित मानला जात होता. या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दर्शवला होता. पण प्रत्यक्षात मतदान करताना शिवसेनेची उदासीनता दिसली. ठाकरेंच्या गटातील तब्बल सहा खासदारांनी आज उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानच केलं नाही, असं वृत्त 'एबीपी माझा'ने दिलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Sharad Pawar (Politician), Supriya sule

    पुढील बातम्या