पुणे, 6 ऑगस्ट : काही दिवसांपूर्वी शिवसेना बंडखोर नेते उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यातील कात्रज चौकात हल्ला करण्यात आला होता. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला होता. आता त्याच कात्रज चौकात उदय सामंत जाहीर सभा घेऊन ठाकरे गटाला खुलं आव्हान देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर पुण्यातील कात्रज चौकात ठाकरे गटातील शिवसैनिकांकडून प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर आता त्याच कात्रज चौकात उदय सामंत जाहीर सभा घेऊन ठाकरे गटाला खुलं आव्हान देणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या काही दिवसात कात्रजमथ्ये पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान अजित पवारांनी राज्य सरकारवर टीकास्त्र केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं सरकार स्थापन होऊन महिना उलटून गेला आहे. तरीही अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. यावेळी शिंदे सरकारने सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या निर्णयावरुनही पवारांनी निशाणा साधला. नगराध्यक्षच नाही तर मुख्यमंत्री पण जनतेतून निवडा, असं आव्हान अजित पवारांनी सरकारला केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्त्यांचा मेळावा अजित पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.