सांगली, 22 मे: दुकानात खाऊ आणण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात विवस्त्र अवस्थेत आढळल्याने सांगली जिल्हा हादरला आहे. इस्लामपूर रोडवरील तुंग येथे ही घटना समोर आली आहे. मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. हेही वाचा… मोठी बातमी! कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीवर शिवसेना मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा याबाबत मिळालेली माहिती अशी की, तुंग येथील विठ्ठलाईनगरामध्ये चांदोली धरणग्रस्तांची वसाहत आहे. या वसाहतीत राहणारी सात वर्षांची मुलगी बुधवारी रात्री 8 वाजता खाऊ आणण्यासाठी जवळच्या दुकानात गेली होती. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी परत आली नाही. म्हणून रात्रीच तिच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला होता. मात्र ती सापडली नाही. गुरुवारी सकाळी पीडित मुलीचा मृतदेह घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. तिच्या डोक्यावर गंभीर जखमही आढळून आली. मुलीवर लैंगिक अत्याचार झाले असावे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. हेही वाचा.. शिवसेना माजी जिल्हा प्रमुखाची निर्घृण हत्या, खुलेआम गोळी झाडून मारेकरी पसार याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमेश दंडिले यांनी पथकासह धाव घेतली. तसेच अप्पर अधीक्षक मनीषा डुबुले यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तनात करण्यात आली असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







