Home /News /news /

शिवसेना माजी जिल्हा प्रमुखाची निर्घृण हत्या, खुलेआम गोळी झाडून मारेकरी पसार

शिवसेना माजी जिल्हा प्रमुखाची निर्घृण हत्या, खुलेआम गोळी झाडून मारेकरी पसार

या घटनेनंतर अनुराग शर्मा यांचे समर्थक संतापले असून त्यांनी जिल्हा हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली.

    रामपूर, 21 मे: उत्तर प्रदेशातील रामपूर येथील शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनुराग शर्मा यांनी निर्घृण हत्या करण्यात आली. अज्ञात मारेकऱ्यांनी अनुराग शर्मा यांच्यावर गोळ्या झाडून ते पसार झाले. शहरातील सिव्हिल लाइन परिसरातील आगापूर भागात ही घटना घडली आहे. खुलेआम मारेकऱ्यांनी अनुराग शर्मा यांच्यावर गोळीबार केला. शर्मा यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र, त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. हेही वाचा... आदित्य ठाकरे आणि भाजप नेत्यात जुंपली, राष्ट्रीय वाद पोचला वैयक्तीक पातळीवर दुसरीकडे, या घटनेनंतर अनुराग शर्मा यांचे समर्थक संतापले असून त्यांनी जिल्हा हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. परिस्थिती गंभीर झाल्याचं लक्षात येताच हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि स्टाफने स्वत:चा जीव वाचवण्यालाठी तेथून पळ काढला. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अनुराग शर्मा यांची पत्नी शालिनी शर्मा या भाजपच्या नगरसेविका आहेत. घटनेनंतर भाजपचे अनेक नेते आणि पदाधिकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस महासंचालक रमित शर्मा रामपूर येथे पोहोचले आहेत. रमित शर्मा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच त्यांनी अनुराग शर्मा यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. भाजीपाला घेऊन घरी जात होते अनुराग ज्वालानगरात राहाणारे अनुराग शर्मा भाजीपाला घेऊन स्कूटीने घरी जात होते. त्यांच्या मागून दुचाकीवर आलेल्या दोन मारेकऱ्यांनी अनुराग शर्मा यांच्यावर खुलेआम गोळी झाडली. नंतर मारेकरी पसार झाले. हेही वाचा...'हिजडा' शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर.., चक्क तृतीयपंथियाने निलेश राणेंना सुनावलं पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे. है. एसओजीसह पोलिसांचे तीन पथक या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.  दरम्यान, अनुराग शर्मा यांच्याविरोधात कोर्टात अनेक खटले दाखल आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Shiv sena

    पुढील बातम्या