Home /News /maharashtra /

उद्धव ठाकरेंचा शिलेदार, आईच्या दशक्रिया विधीला न थांबताच कामासाठी मंत्रालयात हजर झाले विकास खारगे

उद्धव ठाकरेंचा शिलेदार, आईच्या दशक्रिया विधीला न थांबताच कामासाठी मंत्रालयात हजर झाले विकास खारगे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनीही कर्तव्यदक्षतेचं उदाहरण घालून दिलं आहे.

    मुंबई, 29 मार्च : चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातलं आहे. भारतातही या व्हायरसने धडक दिली असून शासन, प्रशासनासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणेतील प्रत्येकजण आप-आपल्या परीने योगदान देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनीही कर्तव्यदक्षतेचं उदाहरण घालून दिलं आहे. विकास खारगे यांच्या आईचं 18 मार्च रोजी निधन झालं. ही बातमी कळताच विकास खारगे यांनी मुंबईतून थेट आपलं गाव गाठलं. शोकाकुल वातावरणात विकास खारगे यांच्या आई रुक्मिणी शंकर खारगे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर 22 तारखेला अस्थीविसर्जन करण्यात येणार होते. मात्र तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली. देशभरातील लॉकडाऊनची स्थिती लक्षात घेत विकास खारगे आणि त्यांच्या इतर भावंडांनी पहाटे लवकर उठून अस्थीविसर्जनाचा कार्यक्रम आटपला. मात्र त्यानंतर विकास खारगे हे दशक्रियाविधीसाठी न थांबता कर्फ्यू संपताच मुंबईकडे रवाना झाले. कारण मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून खरगे यांच्याकडेही महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. हेही वाचा- कोरोनाबाधितांच्या मदतीला धावला गरीबांचा 'विठ्ठल', मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले एक कोटी 'देशातील सध्याची स्थिती पाहता आणि मी ज्या पदावर काम करतो ते लक्षात घेता 14 दिवस कामापासून दूर राहणं योग्य नव्हतं...म्हणून मी हे पाऊल उचललं,' असं विकास खरगे यांनी सांगितलं आहे. स्वत:चं दु:ख बाजूला ठेवून विकास खरगे यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेबद्दल त्यांचं कौतुक होत आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Uddhav thackeray

    पुढील बातम्या