मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोनामुळे पंढरपुरात 400 वर्षांची परंपरा खंडीत, चैत्र वारीचा सोहळा रद्द

कोरोनामुळे पंढरपुरात 400 वर्षांची परंपरा खंडीत, चैत्र वारीचा सोहळा रद्द

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहाता सुमारे 400 वर्षांची परंपरा यंदा खंडीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चैत्री वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहाता सुमारे 400 वर्षांची परंपरा यंदा खंडीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चैत्री वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहाता सुमारे 400 वर्षांची परंपरा यंदा खंडीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चैत्री वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

पंढरपूर, 26 मार्च: कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहाता सुमारे 400 वर्षांची परंपरा यंदा खंडीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चैत्री वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. पंढरपुरात भरणाऱ्या चार प्रमुख वाऱ्या पैकी असलेली चैत्री वारीच्या येत्या 4 एप्रिलला संपन्न होणार होता. मात्र, कोरोना व्हायरसच्या जीवघेण्या सावटामुळे चैत्रीचा हा सोहळा रद्द करण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय आद्य हभप देवव्रत महाराज वासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराज मंडळीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी हभप चैतन्य महाराज देहुकर, हभप निवृत्ती महाराज नमदास, हभप रामकृष्ण महाराज वीर, हभप भाऊसाहेब महाराज गोसावी आदी उपस्थित होते.

हेही वाचा... आणखी आढळले 5 कोरोनाबाधित रुग्ण; राज्याचा आकडा 130 वर

पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी...वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र असला तरी देशावरील आलेले कोरोणाचे संकट भयंकर आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनता कर्फ्यु पुकारला आहे जनतेच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला साथ देण्यासाठी चैत्री वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वारीची परंपरा खंडीत होते आहे, हे कारण काढून कोणीही पंढरपूरला येण्याचा अट्टाहास करु नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा..CORONA संकटात आनंद महिंद्रांचा स्तुत्य उपक्रम, अवघ्या 7500 रुपयांत व्हेंटिलेटर

दरम्यान, चैत्री वारीला तीन ते चार लाख वारकरी भाविकांची पंढरपुरात उपस्थिती असते. वारी रद्द केल्याने कोरोनाला लगाम बसणार आहे. वारीला चारशे वर्षाची परंपरा आहे. वारी रद्द होण्याचा पहिलाच प्रसंग आहे. वारीची परंपरा स्थानिक महाराज मंडळी रुढीनुसार पार पाडतील. जे नियमाचे वारकरी आहेत. त्यांना आपल्या घरातच व्रतवैकल्य करुन विठ्ठलरखुमाईचे पूजन करावे, पंढरपूरला येण्याचा अट्टाहास करुन नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे सध्याविठ्ठल मंदिर बंद आहे. तेव्हा वारकऱ्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन तमाम वारकरी मंडळींना केले आहे.

First published:

Tags: Pandharpur news