कोरोनाच्या संकटात आनंद महिंद्रांचा स्तुत्य उपक्रम, अवघ्या 7500 रुपयांत व्हेंटिलेटर करुन देणार उपलब्ध

कोरोनाच्या संकटात आनंद महिंद्रांचा स्तुत्य उपक्रम, अवघ्या 7500 रुपयांत व्हेंटिलेटर करुन देणार उपलब्ध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त दरातील व्हेंटिलेटरमुळे देशातील वैद्यकीय सेवेला मोठा दिलासा मिळणार आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च : Mahindra and Mahindra यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. ते अत्याधुनिक व्हेंटिलेटर तयार करीत असून ज्याची किंमत केवळ 7,500 रुपये इतकी असणार आहे. सध्या देशात कोरोनाचे संकट आ वासून उभे आहे. हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवा अधिक मजबूत असणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रा यांचा हा उपक्रम स्वस्त दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणारा ठरणार आहे.

Mahindra and Mahindra कंपनीने सांगितले की, ते तयार करत असलेल्या व्हेंटिलेटरला बॅग वॉल्व मास्क व्हेंटिलेटर असंही म्हणतात. येत्या तीन दिवसात या व्हेंटिलेटरला मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित - कोरोनाने मरण्याआधी भुकेनेच मरू, पुण्यातील मजुरांचं हादरवून टाकणारं वास्तव

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट करीत याबाबत माहिती दिली आहे, ते म्हणतात की, आम्ही आयसीयू व्हेंटिलेटर बनवणाऱ्या एका स्वदेशी कंपनीसोबतही काम करत आहोत. सध्याच्या अत्याधुनिक मशीनची किंमत 5 लाख ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान असते. आमच्या टीमद्वारे तयार केलेल्या व्हेंटिलेटर आणीबाणीच्या परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी सक्षम आहेत आणि याची किंमत केवळ 7500 रुपयांपर्यंत असेल.

सर्वात वेगवान उत्पादन करण्याचा प्रयत्न 

देशात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाचा विचार करता, आपत्कालीन परिस्थितीत व्हेंटिलेटर हे एक महत्त्वाचे साधन आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी पूर्वी सांगितले होते की, त्यांची कंपनी व्हेंटिलेटरचे डिझाइन सोपे करण्यासाठी आणि उत्पादनास वेग वाढविण्यासाठी विद्यमान निर्माते तसेच दोन मोठ्या पीएसयूबरोबर काम करत आहे.

मंजुरी मिळताच मॅन्युफॅक्चरिंगसाठी उपलब्ध होईल

गोएंका यांनी व्हेंटिलेटरची कमतरता दूर करण्याच्या कंपनीच्या दृष्टिकोनाबद्दल माहिती देताना सांगितले की, “एकीकडे आम्ही व्हेंटिलेटरच्या सध्याच्या उत्पादकाबरोबरच दोन सरकारी उपक्रमांसंदर्भात काम करीत आहोत. आमचे उद्दीष्ट आहे की, या कंपन्यांचे डिझाइन सुलभ करुन व्हेंटिलेटरच्या उत्पादनास गती देण्यास मदत करावी. दुसरीकडे आम्ही बॅग वॉल्व मास्क व्हेंटिलेटर यावर काम करीत आहोत. याची मान्यता मिळाल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगसाठी सर्वांना उपलब्ध करुन देण्यात येईल.

संबंधित - 2 महिन्यांचा लॉकडाउन अखेर उठला; एकही रुग्ण न सापडल्याने या प्रांताने घेतला मोकळा

First published: March 26, 2020, 10:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading