मुंबई, 26 मार्च : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा धोका वाढतच चालला आहे. देशभरात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. आता आणखी 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 130 वर पोहोचला आहे. सांगतीत 3 आणि कोल्हापूर, पुण्यात प्रत्येकी एक अशी 5 जणांना कोरोना व्हायरसचा लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, एक समाधानाची बाब अशी की, पुण्यात गेल्या 48 तासांत एकाही नव्या रुग्णाची भर पडलेली नाही. नवी मुंबईत मात्र एकीचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना मृत्यूंची संख्या 4 झाली आहे. वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. दुसरीकडे, आज पुन्हा आठ अंकांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
हेही वाचा.. कोरोना झाल्याचा आरोप करत मराठवाड्यात एकाच कुटुंबातल्या तिघांना बेदम मारहाण
नागपूरमध्ये सापडलेला 42 वर्षांचा नवा रुग्ण परदेशातून आलेला नाही. किंवा त्याचा कुठल्या परदेशातून आलेल्या व्यक्तीशी थेट संपर्क झाल्याचं लक्षात नाही. तो दिल्लीहून नागपूरमध्ये आलेला होता. त्यामुळे आता कम्युनिटी ट्रान्समिशनची भीती वाढली आहे. तत्पूर्वी ठाण्यात आणखी एक तर पनवेलमध्ये एक असे दोन नवे कोरोना रुग्ण आज सकाळपासून समोर आले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा..'घर, छोटे व्यवसाय आणि ऑटो लोनचे बँक EMI 3 महिन्यांसाठी स्थगित करावे'
दुसरीकडे, वाशीत झालेल्या मृत्यूविषयी मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्चला या महिलेचा मृत्यू झाला होता. आज शवविच्छेदन अहवाल हाती आला असता हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं समोर आलं. मृत महिला ही उपचारासाठी वाशीमधल्या 2 खासगी रुग्णालयात गेली होती, अशीही माहिती समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.